जाहिरात

Date Milk Benefits: खजुराचं दूध प्यायल्यास कोणते आजार दूर होतील? कसे तयार करावं दूध, कोणी करावा हा उपाय?

Date Milk Benefits: हिवाळा ऋतूमध्ये खजुराचं दूध पिणे फायदेशीर मानले जाते. कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Date Milk Benefits: खजुराचं दूध प्यायल्यास कोणते आजार दूर होतील? कसे तयार करावं दूध, कोणी करावा हा उपाय?
"Dates Milk Benefits: खजुराचे दूध पिण्याचे फायदे"
Canva

Date Milk Benefits: खजुराचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस सेवन केलं शरीराला असंख्य फायदे मिळतील. खजूर दुधामध्ये मिक्स करून खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट लाभ मिळतील. खजूरमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन, मॅग्नेशिअम आणि पॉटेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. शिवाय दुधामध्येही आरोग्यवर्धक गुणधर्मांचा समावेश आहे, जे शरीर निरोगी ठेवण्यास आवश्यक आहेत. कमकुवत हाड्यांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर नियमित खजुराचे दूध प्यावे. खजुराचे दूध प्यायल्यास कोणते फायदे मिळतील आणि कोणी हा उपाय करावा, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

खजुराचे दूध कसे तयार करावे? (How To Consume Dates Milk)

  • रात्री दुधामध्ये तीन ते चार खजूर भिजत ठेवा.

  • दुसऱ्या दिवशी सकाळी हे दूध प्यावे आणि खजूर चावून खावे.
  • खजूर भिजवून खायचे नसेल तर दुधासोबत तुम्ही तीन ते चार खजूर खाऊ शकता.
  • दुधामध्ये साखर मिक्स करण्याची आवश्यकता नाही, कारण खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते.

खजूरचे दूध पिण्याचे फायदे | Date Milk Benefits In Marathi

1. हाडे

दूध आणि खजूर दोन्ही गोष्टींमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम गुणधर्म आहेत, यामुळे हाडे मजबूत होतील आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजारांपासून संरक्षण होईल.

2. पचनप्रक्रिया

पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास खजुराचे दूध प्यावे. यातील पोषणतत्त्व पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत.

Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद

(नक्की वाचा: Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद)

3. ऊर्जा

सकाळी झोपेतून उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर नियमित खजूर भिजवलेले दूध प्यावे.

BCA Juice Benefits: गाजर, बीट, आवळा रस प्यायल्यास काय होतं? डिटॉक्स ज्युसमुळे चेहऱ्यामध्ये घडतील इतके मोठे बदल

(नक्की वाचा: BCA Juice Benefits: गाजर, बीट, आवळा रस प्यायल्यास काय होतं? डिटॉक्स ज्युसमुळे चेहऱ्यामध्ये घडतील इतके मोठे बदल)

4. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com