जाहिरात

Thane Metro News: ठाणे मेट्रो कधीपर्यंत धावणार? प्रताप सरनाईकांनी सांगून टाकलं, पण..

Thane Metro Update News: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही डिसेंबरमध्येच या मार्गिकेच्या लोकार्पणाचे नियोजन असल्याचा दावा केला आहे.

Thane Metro News:  ठाणे मेट्रो कधीपर्यंत धावणार? प्रताप सरनाईकांनी सांगून टाकलं, पण..

Thane Metro News: ठाणे शहरातील घोडबंदर भागात मेट्रो चार प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. या मेट्रो मार्गिकेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही डिसेंबरमध्येच या मार्गिकेच्या लोकार्पणाचे नियोजन असल्याचा दावा केला आहे. मात्र घोडबंदर मार्गावरील मेट्रोच्या स्थानकांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी ही मेट्रो सुरु होईल का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

Mumbra Video: पोलिसांसमोरच टोईंग व्हॅनवरून बाईक खाली उतरवली; चूक कुणाची?

ठाणे मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, वडाळा घाटकोपर- कासारवडवली हा मेट्रो प्रकल्प ठाणेकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो मार्गिका-4 आणि 4-अ' प्रकल्पाची एकूण लांबी 35.20 किमी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे.

सध्या या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. डिसेंबरमध्येच काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ठाणे महापालिका मुख्यालयात मेट्रो मार्गासह विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.

Thane Traffic Update: बापरे! ठाणेकरांची आणखी वाट लागणार!! घोडबंदरबद्दलची मोठी बातमी

या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी मेट्रो प्रकल्प डिसेंबरमध्येच होणार असल्याची घोषणा केली, मात्र अनेक मेट्रो स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे खरचं डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होईल का? असा सवाल आता उपस्थित केला आहे. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com