Sweet Potato Benefits: हिवाळ्यामध्ये बाजारात रताळ्यांची आवक वाढते. हे कंदमूळ केवळ चवीला नाही तर आरोग्यासाठी सुपरफुड मानले जाते. हिवाळ्यामध्ये रताळे खाल्ल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतील. न्युट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रताळ्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत सांगितलीय.
रताळे खाण्याची योग्य पद्धत | Best Way To Eat Sweet Potato | Ratale Khanyachi Yogya Padhat
रताळं उकडून खावं, भाजून नव्हे
लीमा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रताळे भाजून खाण्याऐवजी उकडून खाणे फायदेशीर ठरेल. रताळे उकडल्यास त्यातील साखर पाण्यात उतरते. तसेच ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होते. यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यासह हृदयाचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते.
रताळे उकडून थंड करुन खावं
उकडलेले रताळं थोडेसे थंड होऊ द्यावे आणि त्यानंतर खावं. रताळे थंड झाल्यानंतर त्यामध्ये रेजिस्टेंट स्टार्च तयार होते, जो एक फायबरसारखा पदार्थ असतो. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. यासह शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.
सालीसकट रताळं खावं का?
बहुतांश लोक साल सोलून रताळं खातात, तर लीमा महाजन यांनी सालीसकट रताळे खाणं अधिक पौष्टिक असल्याचं सांगितलंय. याद्वारे शरीराला 30 टक्के फायबर आणि दुप्पट अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होईल. यामुळे पचनप्रक्रिया मजबूत होईल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. पण रताळं स्वच्छ धुऊन शिजवावे.
(नक्की वाचा: Alum Benefits: 10 रुपयांत मिळणारा हा पांढरा दगड आहे प्रचंड उपयुक्त, 5 समस्यांपासून मिळेल सुटका)
हेल्दी फॅट्स
रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटिन नावाचे पोषणतत्त्व असते, ज्याचे शरीरामध्ये व्हिटॅमिन Aमध्ये रुपांतर होते. व्हिटॅमिन ए त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारकशक्तीसाठी अतिशय फायदेशीर असते. हे एक फॅट सॉल्युबल घटक आहे, जे शोषून घेण्यासाठी शरीरामध्ये हेल्दी फॅट्स असणं आवश्यक आहे. रताळं शिजवताना थोडेसे तूप मिक्स करू शकता.
(नक्की वाचा: Flaxseeds Benefits: अळशीच्या बियांचे सेवन सकाळी की रात्री करावे? वेटलॉस होईल का? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)
रताळे खाण्यापूर्वी या गोष्टीचीही काळजी घ्यावी- IBS किंवा पचनशक्ती कमकुवत असल्यास रताळं सोलून खावे.
- रताळे तळून किंवा भाजून खाणे टाळावे, यामुळे पोषणतत्त्व नष्ट होतात.
- किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांनी रताळ्याचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे, कारण यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते.
- मधुमेहग्रस्तांनी जवळपास 100–120 ग्रॅम इतक्या प्रमाणात रताळ्याचे सेवन करावे, अन्यथा रक्तशर्करेची पातळी वाढू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )