Eye Mucus: गंभीर! कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधून पिवळा किंवा पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो?

Eye Care Tips: तुमच्या डोळ्यांमधून जास्त प्रमाणात घाण बाहेर पडतेय का, तर हे शरीरातील एखाद्या पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे संकेत असू शकतात .

जाहिरात
Read Time: 2 mins
"Eye Care Tips: डोळ्यांमध्ये जास्त प्रमाणात घाण का जमा होते?"

Eye Care Tips: रात्रीची झोप पूर्ण करून सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये हलक्या स्वरुपात घाण जमा होणे सामान्य बाब आहे. डोळे स्वच्छ होण्याची ही नैसर्गिक पद्धत आहे. पण काही लोकांच्या डोळ्यांमधून थोड्याथोड्या वेळानं पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. तुम्ही देखील या समस्येमुळे त्रासलेले आहात का? तर सर्वप्रथम हे जाणून घ्या की तुमच्या डोळ्यातून म्युकस बाहेर पडतंय, जे शरीरातील एखाद्या पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यूट्युब चॅनलवर डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित व्हिडीओ शेअर केलाय, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

डोळ्यांमधून घाण का बाहेर पडते?

डॉक्टर बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधून जास्त प्रमाणात घाण बाहेर पडू शकते. शरीरामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस डोळे कोरडे होऊ लागतात. डोळ्यांचा कोरडेपणा वाढू लागल्यानंतर संरक्षणासाठी डोळे जाड स्वरुपातील म्युकस तयार करते, जे चिकट पदार्थाप्रमाणे दिसते. यामुळे डोळ्यांना खाज येणे, गंभीर प्रकरणात अंधुक दिसणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.  

व्हिटॅमिन ए ची कमतरता कोणामध्ये आढळते?

डॉक्टर बर्ग यांनी सांगितलं की, ज्या लोकांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी असते तसेच पित्ताशय, यकृत, आयबीएस समस्येसह पचनक्रिया बिघडलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरता असणं सामान्य बाब आहे. या कारणांमुळे शरीर व्हिटॅमिन ए योग्यरित्या शोषून घेऊन शकत नाही. व्हिटॅमिन ए प्रामुख्याने यकृतामध्ये साठवले जाते. जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा शाकाहारी असतात, त्यांच्या शरीरामध्येही व्हिटॅमिन एचे प्रमाण कमी असते. 

Advertisement

(नक्की वाचा: Fastest Hair Growth Oil: केसांच्या भराभर वाढीसाठी कोणते तेल सर्वात प्रभावी ठरेल? केसांना तेल कसं लावावं? वाचा माहिती)

व्हिटॅमिन एची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे? 

डॉक्टर बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्याचे बलग, दूध, गाजर, तूप, रताळं, पालक, मासे यासारख्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करावा. तसेच पचनप्रक्रिया, यकृत आणि पित्ताशय देखील निरोगी ठेवण्याची काळजी घ्यावी. 

Advertisement

(नक्की वाचा: Moringa Benefits: मोरिंग्याची पानं संत्र्यापेक्षा 7 पट, दुधापेक्षा 17 पट, पालकपेक्षा 25 पट आहेत शक्तिशाली; जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.