Health News: सतत झोप येते का? कितीही झोपलं तरीही झोप पूर्ण होत नाही का? शरीरात या व्हिटॅमिनची आहे कमतरता

Health News: कितीही झोपलात तरी तुम्हाला वारंवार झोप येते का? झोप पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही का? थकवा जाणवतो का? तर शरीरामध्ये महत्त्वाच्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झालीय, हे लक्षात घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Vitamin Deficiency Cause More Sleep: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात झोप येते?"

Health News: तुम्हालाही सतत झोप येत का? अगदी 10 तास झोपल्यानंतरही ताजेतवाने वाटत नाही का? सकाळी झोपून उठल्यानंतरही ताजेतवाने वाटत नाही का, पुन्हा झोपावे वाटतंय का? तुमच्या अयोग्य जीवनशैलीचा परिणाम झोपेवर होतोय, हे लक्षात घ्या. जास्त प्रमाणात झोप येण्यामागील कारण तुमच्या शरीरातील कित्येक जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते. जास्त प्रमाणात झोप येणे हे तुमच्या शरीरातील कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेचे संकेत देत आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊया.. 

व्हिटॅमिन डीची कमतरता (Vitamin D Deficiency)

व्हिटॅमिन डी केवळ हाडांसाठी आवश्यक नसतात तर तुमचा मूड आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यामध्येही महत्त्वाची भूमिका निभावते.  

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे 

  • दिवसभर सुस्तपणा जाणवणे
  • जास्त प्रमाणात झोप येणे
  • स्नायू कमकुवत होणे
  • थकवा जाणवणे 

व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?  

शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये मशरुम, अंड्याचे बलक, पौष्टिक पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करावा. तसेच कोवळ्या उन्हामध्ये बसल्यासही शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल. 

(नक्की वाचा: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात घाणेरडे विचार येतात? हे खाणे करा सुरू गायब होतील सर्व वाईट विचार)

शरीरामध्ये लोह कमी झाल्यास कोणती लक्षणे आढळतात?

  • जास्त प्रमाणात झोप येणे
  • थकवा जाणवणे
  • श्वासोच्छवासाची संबंधित समस्या उद्भवणे
  • भोवळ आल्यासारखे वाटणे

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?

डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, बीट, गूळ आणि  डाळींचा समावेश करावा.

(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील गंभीर कारण, या 4 लोकांना मोठा धोका)

व्हिटॅमिन बी12ची कमतरता ( Vitamin B12 Deficiency)

व्हिटॅमिन B12मुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आळस, थकवा, पायांचे दुखणे आणि झोप जास्त प्रमाणात येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणे

  • थकवा जाणवणे 
  • जास्त प्रमाणात झोप येणे
  • मानसिकरित्या थकल्यासारखे वाटणे
  • मूडमध्ये बदल होणे किंवा नैराश्य येणे

व्हिटॅमिन B12 ची कमतरता कशी भरुन काढावी? 

डाएटमध्ये दूध, अंडे, दही, मासे, मांस यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )