जाहिरात

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात घाणेरडे विचार येतात? हे खाणे करा सुरू गायब होतील सर्व वाईट विचार

Health News: शरीराचे कार्य योग्यरित्या होण्यासाठी तसेच शरीर निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि डोक्यात घाणेरडे विचार येतात? याबाबत माहिती जाणून घेऊया...

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात घाणेरडे विचार येतात? हे खाणे करा सुरू गायब होतील सर्व वाईट विचार
कोणत्या विचारांच्या कमतरतेमुळे डोक्यात वाईट विचार येतात?

Importance of Vitamin B12: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीराला कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यामध्ये प्रोटीन, जीवनसत्त्व, खनिजांचाही समावेश असतो. व्हिटॅमिन्स तर शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांमध्ये व्हिटॅमिन बी12चा देखील समावेश आहे. शरीराच्या कित्येक समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी आणि डीएनएची निर्मिती होते. याशिवाय त्वचा, हाडे आणि नखे मजबूत राहण्यास मदत मिळते. आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कमकुवतपणा जाणवणे, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या तसेच नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळेही मनात नको-नको ते विचार येऊ शकतात. व्हिटॅमिन बी12 कोणत्या पदार्थांद्वारे मिळते आणि या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे जाणून घेऊया...

Latest and Breaking News on NDTV

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये घाणेरडे विचार येतात?

काही रिपोर्ट्समधील माहितीनुसार, व्हिटॅमिन B12 आणि B ग्रुप दुसऱ्या व्हिटॅमिन्ससह मेंदूमध्ये वेगवेगळी रसायने तयार करण्यामध्ये मुख्य भूमिका निभावतात. यामुळे मूड बदलणे, नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. विशेषतः व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मनात नकारात्मक किंवा त्रासदायक विचार येऊ शकतात.

व्हिटॅमिन Bच्या कमतरतेचे आणखी काय परिणाम होऊ शकतात?

व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे थकवा, श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या, शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे स्नायूदुखीची समस्या वाढू शकते. विशेषतः मानदुखीची समस्या वाढू शकते.

White Hair Problem: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? करा है नैसर्गिक उपाय

(नक्की वाचा: White Hair Problem: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? करा है नैसर्गिक उपाय)

व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे?

मांसमासे, अंडे आणि दही, दूध यासारखे डेअरी प्रोडक्ट्स

शाकाहारी असल्यास पौष्टिक नाश्ता, प्लांटबेस्ड दूध (सोया किंवा बदाम)

Latest and Breaking News on NDTV

व्हिटॅमिन बी 12 काय करते?

- व्हिटॅमिन बी 12मुळे शरीराच्या पेशींचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

- व्हिटॅमिन बी 12 डीएनएच्या निर्मितीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

- पदार्थांचे शरीराच्या ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याचे काम करतात.

Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील खरं कारण काय? या 4 लोकांना सर्वाधिक धोका

(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील खरं कारण काय? या 4 लोकांना सर्वाधिक धोका)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com