- अॅसिडिटीची समस्या असल्यास रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊ नये
- गरम पाणी कधी प्यावे?
- गरम पाणी प्यायल्यास कोणते फायदे मिळतील?
Drink Hot Water Side Effects: सकाळी उठल्यानंतर बहुतांश लोक गरम पाणी पितात. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते, वजन कमी होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. खरंतर गरम पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत. पण प्रत्येकासाठी हा उपाय फायदेशीर ठरेलच असे नव्हे. काही लोकांसाठी सकाळी गरम पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.
या पाच लोकांनी गरम पाणी पिणे टाळावे | These 5 People Should Avoid Drinking Hot Water
1. अॅसिडिटीची समस्या
अॅसिडिटी, छातीमध्ये किंवा पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या असल्यास गरम पाणी प्यायल्यास समस्या आणखी वाढू शकतात. गरम पाणी पोटाची म्युकस लायनिंग अधिक पातळ करते, ज्यामुळे अॅसिडची पातळी वाढू शकते, त्यामुळे कोमट किंवा गरम पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.
2. कमी बीपीचा त्रास
लो ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांनी गरम पाणी प्यायल्यास रक्तवाहिन्या अधिक रुंद होतील, यामुळे रक्तदाबाची पातळी आणखी कमी होईल. ज्यामुळे भोवळ येणे, कमकुवतपणा जाणवणे, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतील, अशा लोकांनी सामान्य तापमानातीलच पाणी प्यावे.
3. UTI आणि किडनीची समस्या
खूप गरम पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी बिघडते. शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवणे हे किडनीचे काम असतं. पण खूप गरम पाणी प्यायल्यास किडनीवर अतिरिक्त भार येऊ शकतो. तसेच मूत्रमार्गातील समस्या असल्यास गरम पाण्यामुळे अधिक अस्वस्थपणा जाणवेल.
(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय, जाणून घ्या डॉक्टरांनी या समस्येवर सांगितलेला रामबाण उपाय)
4. गर्भवती महिलागर्भावस्थेदरम्यान शरीर आधीच गरम असते, अशा परिस्थितीत गरम पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे चक्कर येणे, गोंधळल्यासारखं वाटणे आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गर्भवती महिलांना कोमट किंवा सामान्य तापमानातील पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: रात्री झोपताना नाभीवर तेल लावल्यास काय होते? कोणते तेल वापरणं ठरेल सर्वाधिक फायद्याचं)
5. घसा किंवा तोंडाची समस्यासकाळी गरम पाणी प्यायल्यानंतर काही लोकांना घसा खवखवणे, घशामध्ये जळजळ होणे किंवा टॉन्सिलच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही देखील घसा खराब होण्याच्या परिस्थितीचा सामना करत असाल तर गरम पाणी प्यायल्यास स्थिती अधिक बिघडेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)