सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स

Festival Diet Tips: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर पोटभरून ताव मारता येत नाही? चिंता करू नका फॉलो करा या टिप्स

Advertisement
Read Time: 2 mins

प्रियांका पाटील,आहारातज्ज्ञ   

Festival Diet Tips: सणासुदीला गोड पदार्थावर प्रत्येकजण ताव मारतात. अशावेळी अतिरिक्त कॅलरीज नकळत पोटामध्ये जातात. पण साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा रक्तातील साखरेच्या पातळीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स जाणून घेऊया...

भारतीय सण उत्सव हे मिठाई शिवाय अपूर्णच असतात. मिठाईच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहींनी सणासुदीच्या काळात गोड पदार्थांचे सेवन करत असताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सणासुदीच्या काळात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा....

एकाच वेळेस भरपेट जेवण करू नका 

सणासुदीच्या काळामध्ये एकाच वेळेस भरपेट खाल्ले जाते. साखर आणि मीठयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला जातो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. थोड्या-थोड्या अंतराने आणि साखरयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. मधुमेहाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम)

उपवास करणे टाळा

मधुमेहग्रस्त रुग्णांनी अधिक काळ उपवास करणे टाळावे, कारण शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. तुम्ही दिवसभर ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्यांसह पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. 

नैसर्गिक स्वरुपात गोड पदार्थांची निवड करावी

रिफाइंड शुगरऐवजी गूळ आणि खजुराचे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सेवन करावे. आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी साखरयुक्त मिठाई देखील कमी प्रमाणात खावी. साखरयुक्त पेय आणि मद्य पिणे टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

Advertisement

(नक्की वाचा: Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम)

रक्तशर्करेची पातळी तपासा

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासत राहा. वेगवेगळ्या पदार्थांमुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे? हे जाणून घेण्यासाठी साखरेच्या पातळीकडे लक्ष द्या. घरच्या घरी ग्लुकोमीटरच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी तपासू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: वारंवार भूक लागतेय? कशी कमी कराल? आहारतज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स)

हायड्रेटेड राहा 

दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यायला विसरू नका. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पेय उदाहरणार्थ सोडा किंवा कॉफीचे सेवन अति प्रमाणात करणे टाळावे. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.