Sapota Benefits: फक्त चवीलाच नाही, तर 'हे' स्वस्त फळ हृदयासाठी आहे वरदान; आयुष मंत्रालयानेही दिला सल्ला

Sapota Benefits: हृदय, किडनी आणि पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी स्वस्त मिळणारे फळ गुणकारी आहे. तसेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी याची मदत कशी मिळते, याबाबत सविस्तर माहिती वाचा एका क्लिकवर.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sapota Benefits: हृदय, किडनी, पचनप्रक्रियेसाठी गुणकारी फळ"
Canva

Chiku Benefits: फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. चिकू हे फळ केवळ चवीलाच उत्कृष्ट नाही, तर त्यामध्ये औषधी गुणधर्मांचा मुबलक साठा आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांपासून ते किडनीपर्यंतच्या आरोग्यासाठी चीकू अत्यंत गुणकारी मानला जातो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चिकूचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत मिळेल. हे फळ हृदय आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. या छोट्याशा फळामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर हे घटक भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक एकत्रितपणे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात. पोटॅशियम रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देते आणि धमन्यांमध्ये 'प्लाक' जमा होण्यापासून रोखते.

चिकू खाण्याचे फायदे | Benefits of Chiku | Benefits of Sapota In Marathi

1. रक्ताची कमतरता (Anemia)

आयुर्वेदिक उपचारांमध्येही चिकूला विशेष स्थान आहे. चिकू शरीरातील रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाची समस्या दूर करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले लोह (Iron) आणि फॉलिक ॲसिडमुळे लाल रक्तपेशींच्या निर्मिती होण्यास मदत मिळते. नियमित चिकू खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो.

Advertisement

2. किडनीचे आरोग्य

चिकूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे किडनीवरील अतिरिक्त ताण कमी होतो.

(नक्की वाचा: Kidney Failure: तुमची किडनी नीट काम करत नाहीय, हे तुम्हाला कसं कळेल? किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षण काय आहेत?)

3. कोलेस्टेरॉल नियंत्रण

चिकूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. शरीरातील 'बॅड कोलेस्टेरॉल' (LDL) कमी झाल्यामुळे धमन्या स्वच्छ राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो.

(नक्की वाचा: Kidney Detox Drinks: घरच्याघरीच किडनी डिटॉक्स करण्यासाठी डाएटमध्ये 5 ड्रिंक्सचा करा समावेश, हे होतील परिणाम?)

4. पचनशक्ती

चिकू हे एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारे आणि चविष्ट फळ आहे, जे पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात.

Photo Credit: NDTV Marathi

Note: मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी चिकूचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे, कारण यामध्ये नैसर्गिक साखर असते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Advertisement
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )