Heart Attacks Signs: हार्ट अटॅक अचानक नाही येत; हृदयाच्या डॉक्टरांनी सांगितलं, आधीपासून शरीरात दिसणारे 7 संकेत

Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅकपूर्वी शरीर अनेक संकेत देतं. ते ओळखून डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Heart Attack Warning Signs

Heart Attack Symptoms:  एखाद्याला हार्ट अटॅक आला तर लोक म्हणतात हे तर अचानकच झालं. मात्र मेडिकल सायन्स आणि अनुभवी डॉक्टर याच्याशी सहमत नाहीत. हार्ट अटॅक अधिकांश प्रकरणात अचानक नाही तर हळूहळू शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम असतो. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खाण्याच्या पद्धती, अपुरी झोप, तणाव, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब या सर्व गोष्टींचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाच्या नसांमधील ब्लॉकेज हळूहळू वाढतं आणि रक्ताचा प्रवाह अचानक थांबल्याने हार्ट अटॅक येतो. शरीराने दिलेले संकेत वेळीत ओळखले तर हार्ट अटॅकपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. 

इंटरवेन्शनल कार्डियोलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजी विशेषज्ञ डॉ. टीएस क्लेर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं, हार्ट अटॅकपूर्वी शरीर अनेक संकेत देतं. ते ओळखून डॉक्टरांशी संपर्क करणं आवश्यक आहे. 

हार्ट अटॅकपूर्वी दिसणारे ७ संकेत | 7 Important Warning Signs That Appear Before a Heart Attack 

१ छातीत दुखणे किंवा जडत्व

छातीत दबाव वाटणे, जळजळ होणे किंवा जड वाटणे हे सर्वसाधारण संकेत आहेत. या वेदना काही मिनिटांपर्यंत राहू शकतात आणि वारंवार येतात. अनेकांना हा त्रास अॅसिडिटीमुळे होत असल्याचं वाटतं. मात्र हे धोकादायक ठरू शकतं. 

२ धाप लागे

थोड चालल्यास किंवा पायऱ्या चढल्याने किंवा आराम करीत असतानाही अचानक धाप लागते. हे हृदयाच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे. हृदय नीट प्रकारे पंप करू शकत नाही, ज्यामुळे हृदयाला पुरेसं ऑक्सिजन मिळू शकत नाही. 

Advertisement

३ थकवा जाणवणे

जास्त काम न करतानाही थकवा जाणवणे, सकाळी उठताच शरीर जड वाटणे, दररोजची कामं करण्याचा उत्साह नसणे आदी लक्षणं दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. विशेषत: महिलांमध्ये हार्ट अटॅकपूर्वी हे संकेत दिसून येतात. 

Photo Credit: Freepik

४ हात, मान आणि पाठदुखी

हृदयाशी संबंधित वेदना केवळ छातीपर्यंत सीमित नसतात. अनेकदा हे दुखणं डावा हात, मान, जबडा, खांदा आणि पाठीपर्यंत पसरू शकतो. वारंवार हे दुखण उद्भवत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करू घ्या. 

Advertisement

५ घाम येणे आणि घबराट वाटणे..

अचानक घाम येणे, बेचैन होणे, घबराट वाटणं किंवा भीती वाटणे हेदेखील धोकादायक संकेत आहेत. 

६ घेरी येणे

हृदयात रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे मेंदूलाही पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे चक्कर, घेरी येणे, अस्वस्थ वाटणे, उटली होणे आदी त्रास होतो. अनेकदा लोक याला फूड पॉइजनिंग समजतात. 

७ झोपेत बेचैन वाटणे, वारंवार जाग येणे

रात्री अचानक घबराट वाटणे आणि जाग येणे, झोपताना श्वास घ्यायला त्रास होणे हे हृदयाशी संबंधित त्रासाचे संकेत होऊ शकतात.  

Advertisement

नक्की वाचा - Technical Guruji Weight Loss: टेक्निकल गुरू गौरव चौधरीने 4 महिन्यात 30 किलो वजन केलं कमी, वेट लॉस फॉर्म्युला..

या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका...

डॉ. टीएस क्लेर यांच्यानुसार, हार्ट अटॅकपूर्वी मिळणारे संकेत शरीरासाठी इशारा असू शकतो. जर हे वेळेत ओळखले गेले आणि ईसीजी, इको, स्ट्रेस टेस्ट किंवा अँजिओग्राफी सारख्या चाचण्या केल्या गेल्या तर गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते.

डॉक्टरांकडे कधी जाल?

जर १०-१५ मिनिटांहून जास्त छातीत वेदना, श्वास घ्यायला त्रास, घाम येणे, भीती वाटणे, हात आणि जबड्यापर्यंत वेदना पसरत असतील तर तातडीने जवळच्या डॉक्टरकडे जा.

हृदयाला सुरक्षित ठेवण्याचे सोपे उपाय | Easy Ways to Keep Your Heart Healthy

  1. दररोज ३० मिनिटांपर्यंट हलका व्यायाम करा किंवा चालण्याचा व्यायामही उपयुक्त ठरतो.
  2. मीठ, तळलेलं आणि प्रोसेस्ड अन्न कमी खा. 
  3. तंबाखू, धूम्रपान आणि दारूपासून दूर राहा
  4. रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल याची नियमित तपासणी करा. 
  5. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)