High Uric Acid: हाय युरिक ॲसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो की, आपल्या शरीरातील प्रोटीनची गरज कशी पूर्ण करावी? एकीकडे शरीराला प्रोटीनची गरज असते, तर दुसरीकडे प्रोटीन खाल्ल्याने युरिक ॲसिड अजून वाढेल की काय? अशी भीतीही वाटत असते. याच कारणामुळे अनेकदा लोक काहीही खाण्यापूर्वी 100 वेळा विचार करतात. पण आता तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. डॉ. चक्षु मिश्रा (Dr. Chakshu Mishra) यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर असा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो हाय युरिक ॲसिडशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करेल.
येथे पाहा व्हिडीओ...
युरिक ॲसिड वाढू नये म्हणून काय खावे?
1. मूग डाळ
हाय युरिक ॲसिड असलेल्या लोकांसाठी मूग डाळ हा प्रोटीनचा एक उत्तम पर्याय असू शकतो. डॉक्टरांच्या मते, 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये साधारण 24 ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये प्युरीनचे प्रमाण कमी (Low-Purine) असल्याने ती सहज पचते आणि शरीराला त्रासही होत नाही. तुम्ही हवं असल्यास मूग डाळीचे धिरडे (चीला), इडली किंवा स्प्राउट्स बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता.
2. घरी बनवलेले पनीर
घरी बनवलेले पनीर हे सर्वात उत्तम मानले जाते. जर तुम्ही घरी बनवलेल्या पनीरचा रोजच्या आहारात समावेश केला, तर 100 ग्रॅम पनीरमधून तुम्हाला सहज 18 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते, जे तुमच्या दैनंदिन गरजेसाठी उत्तम आहे. तुम्ही हवे असल्यास कमी तेलात पनीरची भुर्जी किंवा पनीरचे धिरडे बनवून खाऊ शकता.
(नक्की वाचा: Egg Benefits: 1 दिवसात किती उकडलेली अंडी खावी? अंड्यामध्ये किती प्रोटीन असते? वाचा न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती)
3. मोड आलेली कडधान्ये (स्प्राउट्स)
जर तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करू शकता. 100 ग्रॅम स्प्राउट्स खाल्ले, तर त्यातून तुम्हाला 15 ग्रॅमपर्यंत प्रोटीन सहज मिळू शकते.
(नक्की वाचा: Soaked Raisins Benefits: रोज सकाळी भिजवलेले 5 मनुके खाल्ल्याने शरीरात काय घडते? डॉक्टर वत्स्य यांनी सांगितली मोठी माहिती)
4. युरिक ॲसिडची समस्या असलेल्यांनी एका दिवसात किती प्रोटीन घ्यावे?
50 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन खाऊ नये. लक्षात ठेवा, तुमच्या आहारात मांसाहारी प्रोटीनचा (Non-Veg Protein) समावेश करू नका आणि जर तुम्ही शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून प्रोटीनची कमतरता भरून काढण्याचा विचार करत असाल, तरीही त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.
डॉ. चक्षु मिश्रा हे एक अनुभवी होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांना होमिओपॅथीच्या क्षेत्रात 14 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी MD - होमिओपॅथी (बालरोगशास्त्र), C.S.D. मुंबई, BHMS आणि CIH या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)