Holi 2026 Date And Shubh Muhurat: फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. देशभरात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सकारात्मक विचारांचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे होळी (Holi 2026). हा सण वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. होलिका पूजा (Holika Puja 2026) कशी करावी, कोणत्या मुहूर्तावर करावी, पूजा सामग्रीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? यंदा होळी सण कधी आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
फाल्गुन पौर्णिमा तिथी | Falgun Purnima 2026 | Falgun Purnima 2026 Tithi Start And End Time
फाल्गुन पौर्णिमा तिथी आरंभ वेळ : 2 मार्च 2026 संध्याकाळी 5.55 वाजता
फाल्गुन पौर्णिमा तिथी समाप्त वेळ : 3 मार्च 2026 संध्याकाळी 5.07 वाजता
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त | Holika Dahan Shubh Muhurat 2026
होलिका दहन करण्यासाठी 2 मार्च संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते रात्री 9.11 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
होलिका दहनाची पूजा सामग्री | Holika Dahan 2026 Puja Samagriगंगाजल, शुद्ध पाणी, हळद-कुंकू, चंदन, अक्षता, फुले, फुलांच्या माळा, गूळ, हळकुंड, बताशे, श्रीफळ, गुलाल, गहू किंवा जवस, कापूर, शेणाच्या गोवऱ्या, विड्याचे पान, लवंग, वेलची, हवन सामग्री
होलिका दहन कसे करावे? | | Holika Dahan 2026 Puja- सर्वप्रथम ज्या ठिकाणी होलिका दहन करायचे आहे, ती जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
- पूजनाची जागा शेणाने सारवून रांगोळी काढावी.
- मधोमध एरंड, माड, पोफळी किंवा ऊस उभा करावा.
- त्याभोवती गोवर्या आणि सुकी लाकडे रचावी.
- धूप-दीप, फुले, चंदन, अक्षता, गूळ, कापूर, हळकुंड, नारळ, विड्याचे पान, लवंग, वेलची, अबीर-गुलाल, कुंकू इत्यादी पूजा सामग्री अर्पण करावी.
- संकल्प करून पूजा करावी आणि नैवेद्य अर्पण करावा.
- यानंतर होलिकायै नमः असे म्हणून होलिका दहन करावे.
- होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी.
- सर्वांना प्रसादाचे वाटप करावे
होळी नेमकी केव्हा? 2 मार्च की 3 मार्च? | Holi 2026 Date Confusion Explained | Ninad Guruji
असूर राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णू यांचा भक्त होता. ही बाब हिरण्यकश्यपूला आवडत नव्हती. वारंवार सांगूनही भक्त प्रल्हाद विष्णूंच्या नावाचा जप करत असत. म्हणून हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादांना उंच कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी प्रल्हादांना काहीही इजा झाली नाही. अखेर हिरण्यकश्यपूनं बहीण होलिकाची मदत घेण्याचं ठरवलं. होलिकेला अग्नीपासून भय नसल्याचा वर प्राप्त होता. याचा दुरुपयोग करून ती भक्त प्रल्हादांना जिवंत जाळण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण तिचा हेतू वाईट असल्याने होलिका स्वतःच जळून खाक झाली आणि विष्णूभक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. हा दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होता. म्हणूनच दिवसापासून होळी सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)