GK News: ट्रकच्या मागे 'Horn OK Please' का लिहितात?, ड्रायव्हरची हौस नाही तर 'हे' आहे खरे कारण

Why Horn OK Please is written on trucks: तुम्ही सर्वांनीच रस्त्यांवरून प्रवास करताना  रंगीबेरंगी ट्रकांच्या मागे 'Horn OK Please' ही ओळ शेकडो वेळा पाहिली असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Why Horn OK Please is written on trucks: . दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका मोठ्या संकटातून या शब्दांचा जन्म झाला.
मुंबई:

Why Horn OK Please is written on trucks: तुम्ही सर्वांनीच रस्त्यांवरून प्रवास करताना  रंगीबेरंगी ट्रकांच्या मागे 'Horn OK Please' ही ओळ शेकडो वेळा पाहिली असेल. ट्रकांच्या मागे लिहिलेले हे वाक्य केवळ एखादी डिझाइन किंवा चालकांची हौस नसून, त्यामागे एक अत्यंत मनोरंजक आणि तितकाच महत्त्वाचा इतिहास दडला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका मोठ्या संकटातून या शब्दांचा जन्म कसा झाला आणि यात मधोमध असणाऱ्या 'OK' या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, याचा हा रंजक प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

दुसऱ्या महायुद्धाशी कनेक्शन काय? (Horn OK Please History )


युट्यूबर रजत आणि ईशा ('चार्टर्ड कपल') यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1940 च्या दशकात म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी भारतातील बहुतांश डिझेलचा साठा युरोपमधील आपल्या सैन्यासाठी वळवला होता. यामुळे भारतात डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली. यावर पर्याय म्हणून भारतीय ट्रकांमध्ये डिझेलऐवजी रॉकेल (Kerosene) चा वापर इंधन म्हणून सुरू करण्यात आला. मात्र, डिझेलच्या तुलनेत रॉकेल हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक इंधन मानले जाते. थोडीशी टक्कर झाली तरी ट्रक एखाद्या बॉम्बसारखा पेट घेऊ शकत होता.

Advertisement

( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )
 

हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि मागून येणाऱ्या वाहनांना सावध करण्यासाठी ब्रिटिशांनी ट्रकांच्या मागे "Horn Please On Kerosene" असा इशारा लिहिण्यास सुरुवात केली. याचा अर्थ मागून येणाऱ्या चालकाने हॉर्न वाजवून पुढे जावे, कारण हा ट्रक ज्वलनशील रॉकेलवर चालत आहे. काळाच्या ओघात लोकांच्या सोयीनुसार 'On Kerosene' या शब्दाचे संक्षिप्त रूप होऊन केवळ 'OK' हे दोनच अक्षरे उरली. पुढे भारतीय चालकांनी 'Horn' आणि 'Please' यांच्या मध्ये हे 'OK' बसवले आणि 'Horn OK Please' ही ओळ प्रसिद्ध झाली. महिंद्रा ट्रक अँड बसनेही 2010 मध्ये या दाव्याला दुजोरा दिला होता.

महाराष्ट्रात 'Horn OK Please' वर का बंदी?

रस्त्यांवर अनेक दशके अधिराज्य गाजवणारा हा फलक महाराष्ट्रात मात्र आता पाहायला मिळत नाही. युट्यूबरने सांगितल्याप्रमाणे, राज्य परिवहन विभागाने 2015 मध्ये या फलकावर पूर्णपणे बंदी घातली. या वाक्यामुळे चालकांना विनाकारण हॉर्न वाजवण्याचे प्रोत्साहन मिळते आणि रस्त्यावर ध्वनिप्रदूषण वाढते, असा निष्कर्ष सरकारने काढला होता. अनावश्यक हॉर्न वाजवण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

( नक्की वाचा : Mosquito Spray: घरातल्या फक्त 3 गोष्टी अन् डासांचा खेळ खल्लास; केमिकलशिवाय डास पळवण्याचे सोपे घरगुती उपाय )

( विशेष सूचना : हा मजकूर सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. 'NDTV मराठी' ने याचा स्वतंत्र पडताळा केलेला नाही. )