Horoscope Today For October 1: कर्क राशीला मिळेल लाभ, कन्या राशीच्या लोकांची चिंता वाढेल; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today For October 1 : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या एका क्लिकवर सर्व माहिती....

जाहिरात
Read Time: 4 mins
Horoscope Today For October 1 : 1 ऑक्टोबरचे राशीभविष्य

Today's Horoscope | 1 October 2025: 1 ऑक्टोबर रोजी (1 October 2025) चंद्र धनु राशीमध्ये आहे, यामुळे आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. त्यांना आनंद, समृद्धी आणि आर्थिक लाभही मिळतील. तर कन्या राशीच्या लोकांनी आळस आणि रागराग करणे टाळणे गरजेचं आहे. कन्या राशीसह कोणत्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य...  

1. मेष (Aries)

मन अस्वस्थ असेल आणि आळसही जाणवेल. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. कामामध्ये यश मिळण्यास उशीर होईल. विरोधकांशी वाद टाळावा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक योजना योग्य पद्धतीने पूर्ण करू शकाल. व्यवसाय किंवा कामानिमित्त बाहेरगावी प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर एखाद्या ठिकाणी प्रवासाची योजना आखली जाऊ शकते.  

2. वृषभ (Taurus)

सरकारविरोधी कारवाया आणि कामापासून दूर राहावे. नवीन कामांचा शुभारंभ करणे टाळावे. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. एखाद्या गोष्टीमुळे चिंता निर्माण होऊ शकते. इतरांशी संवाद साधताना विशेष काळजी घ्यावी. व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. नशिबाची साथ कमी प्रमाणात मिळेल. वरिष्ठांशी वाद टाळावा. नोकरी करणाऱ्यांना त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. मुलांचीही चिंता मनात असेल.  

3. मिथुन (Gemini)

आजचा दिवस आनंदी आणि शांत असेल. दैनंदिन कामामुळे थोडे व्यस्त असाल. मन प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही मनोरंजनाचा आधार घेऊ शकता. मित्रपरिवारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. दुपारनंतर एखाद्या गोष्टीमुळे चिंता निर्माण होऊ शकते, त्यामुळे अधिक भावुक होऊ शकता. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. यादरम्यान मौन बाळगून कामावर लक्ष केंद्रित करा.

Advertisement

4. कर्क (Cancer)

आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला प्रियजनांकडून पाठिंबा मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होऊ शकते. नोकरदारवर्ग टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतील. दुपारनंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. व्यावसायिकांची भागीदारांसोबत फायदेशीर गोष्टींवर चर्चा होतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो.

5. सिंह (Leo)

साहित्य आणि कलेमध्ये आवड निर्माण होईल. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील. अस्वस्थतही वाटेल. दुपारनंतर आर्थिक संकट दूर होऊ शकते. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. घरातील वातावरण आनंददायी असेल. दुपारनंतर तुमचे आरोग्य सुधारेल. व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. इतरांशी अनुचित वर्तन टाळावे, यामुळे वाद होऊ शकतात. व्यावसायिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. एखाद्या मीटिंगमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल.

Advertisement

6. कन्या (virgo)

एखाद्या गोष्टीच्या चिंतेमुळे तुम्ही तणावात असू शकता. दुपारपर्यंत आळसही जाणवेल. आईचे आरोग्यही बिघडू शकते. स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अपत्य किंवा कुटुंबीयांसाठी आर्थिक खर्च होऊ शकतो. दुपारनंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. तरीही वादविवादांपासून दूर राहा. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल. नोकरदारवर्गाचा कामाचा भार वाढेल. 

7. तूळ (Libra)

नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायामध्ये फायदा होईल. नोकर करणाऱ्यांचे टार्गेट पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कनिष्ठांकडूनही पाठिंबा मिळू शकेल. दुपारनंतर तुम्हाला ताजेतवाने आणि आनंदी वाटेल. घरामध्ये वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्येही मतभेद होऊ शकतात. शांत राहून समस्या सोडवा. आर्थिकदृष्ट्या फायदा मिळेल. आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होऊ शकतो.

Advertisement

8. वृश्चिक (Scorpio)

नियोजित काम पूर्ण न झाल्यास तुम्ही निराश होऊ शकता. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. करिअरमध्ये नवीन मार्ग शोधण्याऐवजी सध्याची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. चांगल्या कामामुळे वरिष्ठांची सहानुभूती मिळू शकते. कौटुंबिक वाद होतील. प्रेमसंबंध चांगले ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा पराभव करू शकता. आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असाल. मन शांत असेल. 

9. धनु (Sagittarius)

आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि आर्थिकदृष्ट्या तुमचा फायदे होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही तसेच आनंदी असाल. दुपारनंतर द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते. अनावश्यक व्यावसायिक खर्च होऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. घाईघाईमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर चिंता निर्माण होतील.

10. मकर (Capricorn)

कोर्टकचेरीच्या प्रकरणांपासून आज दूर राहा. मन अस्वस्थ असू शकते. नकारात्मक विचारांमुळे कामांवर थेट परिणाम होऊ शकतो. नोकरदारवर्गाला टार्गेटमुळे काही दिवस समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यावर संयम ठेवा. अपघाताची भीती आहे. दुपारनंतर तुमचे आरोग्य सुधारेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.  

11. कुंभ (Aquarius)

आजच्या दिवसाची लाभदायी सुरुवात होईल. सामाजिक आणि आर्थिकबाबतीत प्रगती होईल. एखादे नवे नाते निर्माण होऊ शकते. दुपारनंतर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. वादविवादांमुळे घरातील वातावरण बिघडू शकते. खर्च होऊ शकतात. कोर्टाशी संबंधित कामांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. लोकांशी नकारात्मक पद्धतीने वागल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.  

12. मीन (Pisces)

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायातील योग्य नियोजन केल्यास प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवास शक्य आहे. वडील आणि घरातील वडीलधाऱ्या लोकांकडून आशीर्वाद मिळतील . उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. जोडीदाराशी तुमचे नाते पक्के होईल.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)