Nano Banana Trend Cyber Security Warning: एआय तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात झालेल्या आधुनिक बदलाने आणि नवनवीन संकल्पनांनी सोशल मीडिया युजर्सना अक्षरश: वेड लावले आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘Ghibli' ट्रेंडनंतर आता नॅनो बनाना टूलचा वापर करुन आपल्याला हवा तसा हटके आणि खास फोटो तयार करतो. सोशल मीडियावर या ट्रेंडने तुफान धुमाकूळ घातला आहे. या स्टाईलमधील तरुण तरुणींचे असंख्य फोटो माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र सध्या चर्चेत असलेल्या या ट्रेंडचा एक विपरित परिणामही समोर आला आहे. ज्याबाबत सायबर क्राईम एक्सपर्ट (Cyber Crime Expert) सायबर अवेअरनेस फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यचे प्रमुख धनंजय देशपांडे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
काय आहे नॅनो बनानाचा धोका? (How AI Nano Banana Tool Can be Dangerous)
पुर्वी फेसबूकवर एक Ghibli नावाचा एक ट्रेंड आला होता ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो पाटवल्यास त्याचा कार्टून बनवून दिला जात होता. त्यावेळीही धनंजय देशपांडे यांनी या ट्रेंडच्या नादी लागू नका असा इशारा दिला होता. मात्र तरुणाईला त्या फोटोंनी चांगलीच भुरळ घातली होती. आता पुन्हा एकदा नॅनो बनाना बाबतही त्यांनी सावधतेचा इशारा दिला आहे.
अशा ऍप्स वापरत असताना ते विविध परवानग्या मागते त्या द्याव्या लागतात. या नॅनो जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज टूललाही थेट आपल्या मोबाईलच्या गॅलरीचा एक्सेस द्यावा लागतो. त्यामुळे हे टूल वापरताना तुमचा खासगी डाटा लिक होण्याची शक्यता असते. घिबलीमध्येही असेच झाले होते. त्यावेळीही ते टूल वापरलेल्या अनेकांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले होते. अशी माहिती धनंजय देशपांडे यांनी दिली आहे.
यामध्येही घिबलीसारखाच धोका आहे. तुमच्या गॅलरीचा, ईमेलचा असे सगळे एक्सेस त्यांच्या ताब्यात जातात. अख्खी गॅलरी त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर तिथून तुमचा फोटो लिक झाला आणि सायबर चोरट्यांच्या हाती लागला तर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. तो तुमचे फोटो वापरुन तुम्हाला ब्लॅकमेल करु शकतो. ते फोटो मॉर्फ करुन तुम्हाला लाखो रुपयांना गंडा घालू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आभासी ट्रेंडपासून सावध रहा. तुमच्या मित्र मैत्रिणींनाही याबाबत जागरुक करा, असे आवाहनही देशपांडे यांनी केले आहे.
नक्की वाचा: एका सेकंदात बनेल तुमचं ट्रेंडिंग 3D मॉडेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस