
Gemini Nano Banana AI 3D Figurines: सोशल मीडियावर सध्या एक नवा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्याचे नाव आहे 'नॅनो बनाना' (Nano Banana). गुगलच्या जेमिनी एआयमुळे हा ट्रेंड शक्य झाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही एक फोटो आणि एका टेक्स्ट प्रॉम्प्टच्या मदतीने स्वतःची किंवा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीची अतिशय आकर्षक आणि खरी वाटणारी 3D प्रतिकृती (figurine) तयार करू शकता. ही 3D प्रतिकृतीची इमेज एका व्हर्च्युअल डेस्कवर, 3D मॉडेलिंगचा प्रीव्ह्यू दाखवणाऱ्या स्क्रीनसह आणि व्यावसायिक collectible figures सारख्या पॅकेजिंगमध्ये दिसते.
नक्की वाचा: एका सेकंदात बनेल तुमचं ट्रेंडिंग 3D मॉडेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
सेलिब्रिटींनाही आवडलाय ट्रेंड
या ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी, वापरकर्त्यांना फक्त जेमिनीच्या प्लॅटफॉर्मवर एक फोटो अपलोड करायचा आहे आणि एक विशिष्ट प्रॉम्प्ट (text prompt) कॉपी-पेस्ट करायची आहे. त्यानंतर काही सेकंदातच एआय तुम्ही अपलोड केलेल्या फोटोला एका 3D प्रतिकृतीत रूपांतरित करतो. भारतातही या ट्रेंडची बरीच चर्चा सुरू आहे.
Celebrating creativity and the charm of our railways with the Nano Banana 3D Figurine Trend...🚉 ✨#NanoBanana #Gemini #Trend #NCRailway #IndianRailways @RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/AzEBTdcfGJ
— North Central Railway (@CPRONCR) September 11, 2025
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही या ट्रेंडमध्ये सहभागी होत स्वत:ची एक मेजय तयार केली आहे. ही इमेज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. ही इमेज शेअर करताना त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या तरुण सहकारी आणि समर्थकांनी त्यांना 'हा ट्रेंड वापरून बघा' असे सांगितले होते. यावरून या ट्रेंडची लोकप्रियता दिसून येते.
My young friends suggested me to go with the trend — so here it is 😁 pic.twitter.com/tUg3uMEptp
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 9, 2025
कशी बनवाल 3D प्रतिकृती? (Nano Banana AI 3D Figurines Prompt)
- Step 1: तुमच्या ब्राउझरमध्ये Google Gemini (किंवा Google AI Studio) ओपन करा.
- Step 2: ज्या फोटोची प्रतिकृती बनवायची आहे, तो फोटो अपलोड करा.
- Step 3: खालील प्रॉम्प्ट (कमांड) जशीच्या तशी कॉपी करून पेस्ट करा:
- "Create a 1/7 scale commercialised figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, with no text on the base. The content on the computer screen is a 3D modelling process of this figurine. Next to the computer screen is a toy packaging box, designed in a style reminiscent of high-quality collectible figures, printed with original artwork. The packaging features two-dimensional flat illustrations."
- Step 4: 'Generate' वर क्लिक करा आणि काही सेकंदांतच तुमची 3D प्रतिकृती तयार होईल.
- Step 5: तयार झालेली प्रतिकृती पाहून तुम्ही तुमच्या प्रॉम्प्टमध्ये बदल करून किंवा दुसरा फोटो वापरून नवीन प्रतिकृती तयार करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world