जाहिरात

Interesting story: एक महिला जास्तीत जास्त किती मुलांना जन्म देऊ शकते? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं

भारताचा विचार केल्यास सध्या तरी जोडप्यांची पसंती एक किंवा दोन आपत्यांना जन्म देण्याची असते.

Interesting story: एक महिला जास्तीत जास्त किती मुलांना जन्म देऊ शकते? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं
  • आई होण्याचा अनुभव प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण मानला जातो
  • निरोगी महिला तिच्या आयुष्यात पंधर ते वीस मुलांना जन्म देवू शकते
  • प्रजनन क्षमता वयाच्या तेराव्या वर्षी सुरू होऊन ४५ ते ५० वर्षांपर्यंत कायम राहते

आई होणं हे प्रत्येक महिलेचं सुंदर स्वप्न असतं. तो क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो. काही महिलांच्या नशिबी आई होणं असतं तर काहींच्या पदरी हे सुख पडत नाही. अनेक अडचणी आणि मेडीकल इमर्जन्सी मुळे त्यांना आई होता येते. आज काल आपण पाहीलं तर अनेक जोडप्यांना एक मुल असतं. जास्तीत जास्त दोन मुलं असतात. पहिले ही संख्या जास्त असायची. पण बदलत्या राहणीमाना नुसार मुलांना जन्म देण्याची संख्या कमी झाली आहे.  त्यात अशी एक गोष्ट ही चर्चीली जाते ती म्हणजे एक महिला किती मुलांना जन्म देवू शकते. तेच आपण आज पाहणार आहोत. 

महिलां मुलांना जन्म देतात. एक निरोगी महिला आपल्या आयुष्यात पंधार ते वीस मुलांना जन्म देवू शकते. महिलांची प्रजनन क्षमता त्यासाठी महत्वाची मानली जाते. ही प्रजनन करण्याची त्यांची क्षमता वयाच्या 13 व्या वर्षी निर्माण होते. ही प्रक्रीया वयाच्या 45-50  वर्षा पर्यंत कायम असते. अशा स्थिती जास्तीत जास्त मुलं कोणत्या महिलेला आणि कुठे झाली आहेत असा प्रश्न ही तुम्हाला पडला असेल. त्याचे ही उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहेत. जगात सर्वाधिक मुलं जन्माला घालण्याचा विक्रम एका रशियन महिलेच्या नावावर आहे. 

नक्की वाचा - Imli Facts: चिंच खाल्ल्याने खरंच उंची वाढत नाही? लहानपणी तुम्हीही खाल्लाय का आईचा ओरडा, धक्कादायक सत्य समोर

या रशियन महिलेचे नाव व्हेलेंटीना वासिल्येवा आहे. तिने जवळपास 69 मुलांना जन्म दिला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ही झाली होती. मात्र एकाच महिलेला जास्त आपत्य झाल्यास त्याचा परिणाम तिच्या शरिरावर प्रखर्षाने दिसून येतो. प्रसूती झाल्यानंतर त्या मुलाच्या आईला शरीर पुर्ववत होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचे अंतर आवश्यक असते. अनेक वेळा हे अंतर पाळले जात नाही त्याचा थेट परिणाम त्या महिलेच्या प्रकृतीवर होतो.  

नक्की वाचा - Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती

शिवाय महिलेला वारंवार गर्भधारणा झाल्यास त्याचा ही परिणाम तिच्या शरिरावर होवू शकतो. या शिवाय अनेक मुलांना जन्म देण्यासाठी महिलांची प्रसुती ही सिझेरिन द्वारे करावी लागते. सतत जर नॉर्मल डिलेव्हरी झाली तर त्याचा ही परिणाम महिलांच्या शरीरावर होतो. भारताचा विचार केल्यास सध्या तरी जोडप्यांची पसंती एक किंवा दोन आपत्यांना जन्म देण्याची असते. काही जोडपी तर मुलांना जन्म देण्यासाठी फार उत्साही नसतात. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com