Washing Machine Tips : वॉशिंग मशिनमध्ये एका वेळी किती कपडे धुवायचे? कपडे धुण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. पण अनेक लोकांची तक्रार असते की मशीनमध्ये त्यांचे कपडे नीट स्वच्छ होत नाहीत किंवा त्यांची वॉशिंग मशीन लवकरच खराब होते.जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल,तर त्यामागे एक कारण आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Washing Machine Clothe Cleaning Tips
मुंबई:

Washing Machine Clothes Cleaning Tips : कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. पण अनेक लोकांची तक्रार असते की मशीनमध्ये त्यांचे कपडे नीट स्वच्छ होत नाहीत किंवा त्यांची वॉशिंग मशीन लवकरच खराब होते.जर तुमच्याबाबतीतही असे होत असेल,तर त्यामागे एक कारण आहे. मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे टाकल्यावर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मशिनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे एकाचवेळी टाकल्यास काय घडतं? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

  • मशीन नीट काम करू शकत नाही
  • कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत
  •  मशीन लवकर खराब होण्याची शक्यता वाढते

वॉशिंग मशीनमध्ये एका वेळेस किती कपडे धुणे योग्य असते?

प्रत्येक वॉशिंग मशीनची एक ठराविक क्षमता असते. जसे 6 kg, 7 kg, 8 kg किंवा 10 kg.या क्षमतेनुसार, मशीन एका वेळेस कोरडे कपडे (Dry Clothes)किती वजनाचे व्यवस्थित धुऊ शकते. याचा अर्थ असा नाही की ड्रम जितका भरू शकतो तितके कपडे टाकावेत.
ड्रम केवळ 70–80% पर्यंतच कपड्यांनी भरावा, जेणेकरून कपडे फिरण्यासाठी आणि पाण्याच्या वहनासाठी पुरेशी जागा राहील.

नक्की वाचा >> Car Safety Tips : कार पाण्यात पडल्यावर काय करावं? बुडण्याआधीच 'या' 6 गोष्टी तातडीनं करा, तुमचा जीवही वाचू शकतो

6–7 kg क्षमतेची वॉशिंग मशीन

जर तुमची मशीन 6–7 kg क्षमतेची असेल, तर त्यात जवळपास 20 छोटे ते मध्यम आकाराचे कपडे आरामात धुतले जाऊ शकतात.
6–7 kg क्षमतेच्या मशीनमध्ये तुम्ही साधारणपणे खालील कपडे एका वेळेस सहज धुऊ शकता. 

  • 2 शर्ट
  • 2 पॅन्ट/जीन्स
  • 2 हलके टॉवेल
  • 2 उशीचे अभ्रे (पिलो कव्हर्स)
  • 1 बेडशीट

यापेक्षा जास्त कपडे मशीनमध्ये टाकल्यास काय होईल?

  • कपडे एकमेकांना चिकटतात,
  • पाण्याचा आणि डिटर्जंटचा पुरेसा प्रवाह होत नाही
  • त्यामुळे कपडे योग्य प्रकारे स्वच्छ होत नाहीत
  • आणि मशीनवरही अनावश्यक ताण येतो

नक्की वाचा >> Hyundai च्या 'या' 4 गाड्यांचा विषयच हार्ड, 2026 मध्ये मार्केट करणार जाम, लुक, परफॉरमन्स अन् जबरदस्त मायलेज

7–8 kg क्षमतेची वॉशिंग मशीन

7–8 kg क्षमतेच्या मशीनमध्ये तुम्ही साधारण 30–40 कपडे एका वेळेस धुऊ शकता.यात तुम्ही खालील कपडे टाकू शकता:

  • 3 शर्ट
  • 3 जीन्स
  • 3 टॉवेल
  • 3 उशीचे अभ्रे (पिलो कव्हर्स)
  • 2 बेडशीट

ही मात्रा मशीनच्या क्षमतेनुसार संतुलित असते. कपड्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळते. 
धुणे (वॉश), स्वच्छ करणे (रिंस) आणि पाणी काढणे (स्पिन) योग्य प्रकारे होते. मशीनवर अनावश्यक ताण येत नाही.

Advertisement

8–9 kg क्षमतेची वॉशिंग मशीन

या क्षमतेच्या मशीन मोठ्या कुटुंबांसाठी चांगला पर्याय असतात. अशा मशीनमध्ये एका वेळेस जवळपास 40 कपडे सहज धुतले जाऊ शकतात.
या मशीनमध्ये कपड्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळते, त्यामुळे स्वच्छता अधिक चांगली होते.

10 kg किंवा त्याहून अधिक क्षमतेची वॉशिंग मशीन

10 kg किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या मशीन मोठ्या कुटुंबांसाठी किंवा जास्त कपडे धुणाऱ्यांसाठी सर्वोत्तम असतात. यात एका वेळेस 50 किंवा त्याहून अधिक कपडे धुता येतात.

Advertisement

एका वेळी तुम्ही या मशीनमध्ये खालील कपडे सहज धुऊ शकता:

  • 4 शर्ट
  • 4 पॅन्ट
  • 4 टॉवेल
  • 4 उशीचे अभ्रे (पिलो कव्हर्स)
  • 3 बेडशीट

वॉशिंग मशीन ओव्हरलोड केल्यास:

  • कपडे नीट स्वच्छ होत नाहीत
  • मशीनवर अनावश्यक भार पडतो
  • वीज आणि पाण्याचा वापर वाढतो
  • मशीन लवकर खराब होण्याची शक्यता वाढते

म्हणून नेहमी मशीनच्या क्षमतेनुसारच कपडे धुवा. त्यामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जातात. मशीन अधिक काळ सुरळीत चालते.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.