जाहिरात

Hyundai च्या 'या' 4 गाड्यांचा विषयच हार्ड, 2026 मध्ये मार्केट करणार जाम, लुक, परफॉरमन्स अन् जबरदस्त मायलेज

ह्युंदाई यावर्षी 4 नवीन जबरदस्त गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाड्यांमध्ये फक्त दमदार फिचर्सच मिळणार नाही,तर लेटेस्ट तंत्रज्ञान, मॉडर्न फीचर्स आणि शानदार लुक्स यांचं उत्तम कॉम्बिनेशनही पाहायला मिळणार आहे.

Hyundai च्या 'या' 4 गाड्यांचा विषयच हार्ड,  2026 मध्ये मार्केट करणार जाम, लुक, परफॉरमन्स अन् जबरदस्त मायलेज
Hyundai 2026 Cars Launch
मुंबई:

Hyundai 2026 Cars :   वर्ष 2026 हे कारप्रेमींसाठी धमाकेदार ठरणार आहे, कारण ह्युंदाई यावर्षी 4 नवीन जबरदस्त गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाड्यांमध्ये फक्त दमदार फिचर्सच मिळणार नाही,तर लेटेस्ट तंत्रज्ञान, मॉडर्न फीचर्स आणि शानदार लुक्स यांचं उत्तम कॉम्बिनेशनही पाहायला मिळणार आहे. SUV पासून इलेक्ट्रिक कारपर्यंत,ह्युंदाईच्या या नवीन किंवा अपडेटेड कार बाजारात मोठा धमाका करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही यावर्षी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल,तर ही सविस्तर माहिती वाचा..आज आम्ही तुम्हाला ह्युंदाईच्या त्या 4 गाड्यांबद्दल सांगणार आहोत,ज्या यावर्षी लॉन्च होऊ शकतात.

कोणत्या आहेत त्या चार गाड्या?

ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार,कार निर्माता कंपनी ह्युंदाई बाजारात वरना फेसलिफ्ट,एक्स्टर फेसलिफ्ट, Ioniq 5 फेसलिफ्ट आणि ह्युंदाई Bayon या गाड्या लॉन्च करू शकते. या गाड्यांपैकी काहींचे टेस्टिंग व्हर्जन पूर्ण झाले आहेत. 

1. ह्युंदाई वरना फेसलिफ्ट (Hyundai Verna Facelift)

2026 मध्ये ह्युंदाई वरना फेसलिफ्ट बाजारात दाखल होऊ शकते.या कारची किंमत जवळपास 11 लाख रुपये ते 18 लाख रुपयांपर्यंत असू शकते.  नवीन वरन कारचं फ्रंट डिझाइन अधिक शार्प असेल आणि नवीन सोनाटासारखे फिचर्स यात असू शकतात.

इंटीरियरमध्येही बदल पाहायला मिळू शकतात

डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

नक्की वाचा >> पालकांकडे राहणार लहान मुलांच्या WhatsApp चं कंट्रोल? 'या' नवीन फिचरमुळे सर्वकाही बदलू शकतं!

2. ह्युंदाई एक्स्टर फेसलिफ्ट (Hyundai Exter Facelift)

रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाईच्या नव्या एक्स्टर फेसलिफ्टमध्ये 12.9‑इंच मोठं टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 9.9‑इंचचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकतो.याशिवाय बंपर,हेडलॅम्प आणि टेललॅम्पमध्येही काही किरकोळ अपडेट्स पाहायला मिळू शकतात.मात्र इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

3. ह्युंदाई Ioniq 5 फेसलिफ्ट (Hyundai Ioniq 5 Facelift)

रिपोर्ट्सनुसार, फेसलिफ्टेड Hyundai Ioniq 5 च्या बाहेरच्या डिझाइनमध्ये काही हलके‑फुलके बदल केले जाऊ शकतात.त्यात नवीन ग्रिल,नव्या डिझाइनचे बंपर आणि नवीन स्टाइलची अलॉय व्हील्स मिळू शकतात. बॅटरी पॅकही आधीपेक्षा मोठा मिळण्याची शक्यता असून यामुळे ड्रायव्हिंग रेंज पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल.

नक्की वाचा >> Viral Puzzle: घरात आहेत 4 लोक, 1 बहिरा, 1 मुका, 1 आंधळा, 1 लंगडा, लाईट गेल्यावर सर्वात आधी मेणबत्ती कोण लावेल?

4. ह्युंदाई Bayon (Hyundai Bayon)

ह्युंदाई ही कार फेस्टिव सीजनमध्ये लॉन्च करू शकते. डिझाइनच्या बाबतीत नवीन ह्युंदाई बेयॉनचा लुक मोठ्या प्रमाणात वरनासारखा असू शकतो. मात्र इंटीरियर इतर ह्युंदाई कारसारखंच राहण्याची शक्यता आहे.यात 1.2‑लीटर, 4‑सिलेंडर टर्बो‑पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. मायलेज 1.5‑लीटर पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com