Dubai Petrol Pump Worker Salary : दुबईमध्ये पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती रुपये सॅलरी मिळते? भारत, पाकिस्तान, नेपाळ या देशांमधून दुबईला जाणारे कित्येक प्रवासी तेथे पेट्रोल पंपावर काम करतात. पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्यांना किती पगार मिळतो, असा सवाल निर्माण होतो. तेथे पेट्रोल पंपावर नोकरी करण्याची प्रक्रिया काय असते आणि तेथे ते किती रुपये कमावतात?
ज्या प्रकारे भारतात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियमचे पेट्रोल पंप आहेत, त्याप्रमाणेच दुबईत ADNOC, ENOC, Emarat आदी पंप असतात. या कंपन्यांचे फ्लूएल स्टेशन असतात. ज्याच्या माध्यमातून पेट्रोल ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं. या पंपांवर विविध कामांसाठी माणसांची गरज असते. ज्यामध्ये गाडी धुणे, टायरची हवा तपासणं, पेट्रोल फिलिंग, कॅशियर आदी कामांसाठी माणसांची गरज असते. नेपाळ, पाकिस्तान, भारत, फिलिपिन्समधून येणारे लोक येथील पेट्रोल पंपांवर दिसतात.
नोकरी कशी मिळते?
दुबईच्या पेट्रोल पंपांवर दोन प्रकारे नोकरी मिळते. एक कंपन्या स्वत: लोकांची भरती करतात आणि काही परिस्थितीत थर्ड पार्टी कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर भरती केली जाते. याशिवाय काही कंपन्या कर्मचाऱ्यांमा पगारासह राहण्याचीही व्यवस्था करतात. याशिवाय काही कंपन्या केवळ पगार देतात, ज्यानंतर कर्मचाऱ्यांमा राहण्याची व्यवस्था स्वत:चं करावी लागते.
कोणाला भरती केलं जातं?
या पोस्टसाठी १२ वी पास किंवा माध्यमिक शिक्षण, याशिवाय बेसिक इंग्रजी संभाषण आवश्यक आहे. ग्राहकांना सेवा देण्याचा थोडा अनुभव गरजेचं असतो. शारिरीक फिटनेससह ३५ हून कमी वयाच्या तरुणांना प्राधान्य दिलं जातं.
पगार किती मिळतो?
पगाराबद्दल सांगायचं झालं तर कार धुणाऱ्यांना कमी पगार दिला जातो, तर कॅशियरला जास्त पगार असतो. हे पगार वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे पेट्रोल पंपावर कामासाठी १०००-१२०० AED ते २००० AED मिळतात. ज्या कंपन्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था करीत नाहीत ते २४०० AED पर्यंत पगार देतात. जर भारतीय रुपयांबद्दल सांगायचं झालं तर साधारण ४० हजार महिना पगार दिला जातो. काही पंपांवर ६० हजारांपर्यंतही पगार मिळतो.