How to remove cockroaches from kitchen : किचन म्हणजेच हा आपल्या घराचा असा भाग आहे जिथे आपण सर्वात जास्त वेळ घालवतो. येथे केवळ जेवण बनत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही जपले जाते. जेवण बनवताना किंवा स्वच्छतेमध्ये केलेली थोड़ीशी निष्काळजी संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडवू शकते. किचनमध्ये घाण आणि आजारांचे माहेरघर असलेली झुरळे दिसू लागली, तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. झुरळांमुळे फूड पॉइजनिंग, टायफॉइड आणि ॲलर्जी यांसारखे त्रास होऊ शकतात. केमिकलचा वापर न करता किचनमधून झुरळांना कसे पळवायचे, याचे 9 प्रभावी मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. लवंगाचा उग्र वापर
किचनमध्ये उपलब्ध असलेली लवंग केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर झुरळांना पळवण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. लवंगाचा उग्र वास झुरळांना अजिबात सहन होत नाही. यासाठी किचनच्या कपाटांमध्ये किंवा जिथे झुरळे जास्त दिसतात अशा कोपऱ्यांमध्ये 8 ते 10 लवंगा ठेवाव्या. याच्या वासाने झुरळे तिथे फिरकणार नाहीत.
2. बेकिंग सोडा आणि साखर
बेकिंग सोडा आणि पिठीसाखर समप्रमाणात एकत्र करून ते किचनच्या कोपऱ्यात, सिंकच्या खाली आणि कपाटांच्या मागे शिंपडावे. साखर झुरळांना स्वतःकडे आकर्षित करते, तर साखरेसोबत पोटात गेलेला बेकिंग सोडा झुरळांना आतून नष्ट करण्याचे काम करतो.
3. तमालपत्राचा नैसर्गिक सुगंध
तमालपत्र आपल्या जेवणाची चव वाढवते, पण झुरळांना याचा सुगंध आवडत नाही. 5 ते 6 तमालपत्र हाताने कुस्करून किंवा त्यांची पावडर करून किचनच्या कोपऱ्यात ठेवावी. याच्या वासामुळे झुरळे तो भाग सोडून लगेच पळून जातात.
( नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )
4. कडुनिंबाचे तेल किंवा पावडर
कडुनिंबात कीटकनाशक गुणधर्म असतात जे कीड आणि झुरळांना दूर ठेवतात. तुम्ही कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे तयार करू शकता किंवा ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त आहे तिथे कडुनिंबाची पावडर शिंपडू शकता.
5. पांढरा सिरका (व्हिनेगर)
किचन स्वच्छ करण्यासाठी सिरका हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. समप्रमाणात पांढरा सिरका आणि पाणी एकत्र करून एका स्प्रे बाटलीत भरावे. रात्री किचनचे काम संपल्यावर गॅस शेगडी आणि सिंकच्या आजूबाजूला याचा स्प्रे करावा.
6. काकडीच्या सालींचा प्रयोग
काकडीच्या साली झुरळांना पळवण्याचे काम करू शकतात. एका ॲल्युमिनियमच्या डब्यात काकडीच्या साली टाकून रात्रभर ठेवा. काकडी आणि ॲल्युमिनियम यांच्यात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे एक विशिष्ट वास निर्माण होतो, जो झुरळांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
( नक्की वाचा : Kaju Katli: तुमच्या काजू कतलीवरचा चांदीचा वर्ख शाकाहारी आहे की मांसाहारी? संभ्रम दूर करण्यासाठी लगेच करा क्लिक )
7. दालचिनी पावडर
दालचिनी केवळ एक मसाला नसून झुरळांसाठी तो एक मोठा अडथळा आहे. किचन प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यांत दालचिनीची पावडर शिंपडल्यास त्याच्या तीव्र आणि उग्र वासामुळे झुरळे किचनमध्ये शिरकाव करत नाहीत.
8. लिंबाचा रस आणि स्वच्छता
लिंबू हा एक उत्तम क्लीनिंग एजंट आहे. एक बादली पाण्यात 2 लिंबांचा रस मिसळून त्याने किचनच्या जमिनीवर पोछा मारावा. लिंबाच्या सिट्रस वासामुळे आणि स्वच्छतेमुळे झुरळांना तिथे राहणे कठीण होते.
9. पुदिन्याचे तेल
पुदिन्याच्या तेलाचा सुगंध आपल्याला फ्रेश वाटतो, पण झुरळे या वासापासून दूर पळतात. पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून त्याचा स्प्रे केल्यास किचनमधील झुरळे कमी होण्यास मोठी मदत होते.