Ayushman Card चा वापर करुन कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतील मोफत उपचार? घरबसल्या करा चेक

Ayushman Card Eligible Hospitals: तुम्हाला या योजनेनुसार मोफत अर्ज करायचा असेल कर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या शहरामधील संबंधित हॉस्पिटलची माहिती हवी.

Advertisement
Read Time: 2 mins
A
मुंबई:

Ayushman Card Eligible Hospitals: देशातील गरीब आणि गरजू व्यक्तींवर मोफत उपचार करण्यासाठी केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजना चालवत आहे. ही योजना 2018 साली सुरु करण्यात आली. तुमच्याकडं महागड्या उपचारासाठी खर्च करायला पैसे नसतील तर तुम्ही या योजनेनुसार 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करु शकता. तुम्हाला यासाठी आयुष्यमान योजनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड दाखवावे लागेल. हे कार्ड सरकारकडून दिले जाते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयुष्यमान कार्डसाठी कसा अर्ज करणार?

आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून तुमच्या आजारांवरील उपचारांचा खर्च मोफत केला जातो. या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हे कार्ड तुम्हाला दाखवावे लागते. कोणत्याही सरकारी हॉस्पिलमध्ये किंवा आरोग्य केंद्रात तुम्ही आयुष्यमान कार्डसाठी अर्ज करु शकता. या कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. 

हॉस्पिटल शोधणे सोपे

तुम्हाला या योजनेनुसार मोफत अर्ज करायचा असेल कर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या शहरामधील संबंधित हॉस्पिटलची माहिती हवी. तुमच्या शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डच्या अंतर्गत उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे, हे तुम्हाला माहिती नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही आरामात, घरबसल्या तुमच्या घराजवळचं किंवा शहरातलं हॉस्पिटल ऑनलाईन शोधू शकता. 

( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
 

हॉस्पिटल कसं शोधणार?

आयुष्यमान भारतची वेबसाईट  pmjay.gov.in वर जा
फाईंड हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा आणि हॉस्पिटलचा प्रकार (सरकारी किंवा खासगी) निवडा.
तुम्हाला कोणत्या आजारावर उपचार करायचा आहे ते निवडा.
त्यानंतर Empanelment Type मध्ये PMJAY निवडा.
आता स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका आणि सर्चवर क्लिक करा.
तुमच्या समोर आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व हॉस्पिटलची यादी येईल. त्याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये कोणत्या आजरांवरील उपचार कव्हर करण्यात आले आहेत त्याचीही माहिती असेल.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

तुम्ही आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 'आयुष्मान भारत' ची वेबसाईट पाहा. अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात चौकशी करा. 

Topics mentioned in this article