AC che bill kami kase karal : उन्हाळ्याच्या दिवसात घरी पोहोचताच सर्वात आधी आपण एसीचा रिमोट शोधू लागतो. लवकरात लवकर खोली थंड कधी होईल, याची वाट पाहत राहतो. मात्र तुम्ही एसीचा रिमोट लक्ष देऊन पाहिला तर यात अनेक मोड असतात. ज्यामध्ये कुलिंग आणि टर्बो मोडदेखील असतात. यामधील कोणता मोड खोलीत अधिक थंडावा देण्यास मदत करेल आणि सोबतच विजेचं बिल अधिक वाढू देणार याबाबत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया एसीचा टर्बो मोड आणि कूल मोड काय आहे, आणि याचा खिशावर कसा परिणाम होतो.
एसीचा टर्बो मोड आणि कुलिंग मोड काय असतो?
टर्बो मोड कसं काम करतं?
जेव्हा तुम्ही बाहेरुन येता, तेव्हा असं वाटतं खोली तातडीने थंड व्हावी, यासाठी तुमच्यासाठी टर्बो मोड बेस्ट असतो. जेव्हा तुम्ही एसीला टर्बो मोड किंवा हाय पॉवर मोडवर ठेवता, तेव्हा या मोडमध्ये एसी ऑन करताच एसीचा कम्प्रेसर आणि पंखा पूर्ण गतीने काम करू लागतो. ज्यामुळे खोली लवकर थंड होते.
कुलिंग मोड काय आहे?
लोक एसी कुलिंग मोडवर ठेवतात. हा एसीचा एक स्टँडर्ड मोड असतो. यामध्ये तु्म्ही तापमान आपल्यानुसार, कमी आणि जास्त करू शकता. जेव्हा तुम्ही खोलीचे तापमान सेट करता, आणि ते तापमान त्या पातळीवर पोहोचतं, तेव्हा एसी कंप्रेसर थांबतो आणि त्याचा वेग कमी होतो.
विजेची बचत कशात होते?
वीज वाचवणे आणि किफायतशीर पद्धतीने एसी चालविण्याबद्दल असेल तर कुलिंग मोड अधिक चांगला पर्याय असतो. जेव्हा तुम्ही तापमान
२४ डिग्रीवर सेट करता, त्यावेळी एसीवर जास्त प्रेशर येत नाही आणि वीज कमी खर्च होते. ज्यावेळी तुम्ही बराच काळ खोलीत बसत असाल किंवा रात्री झोपताना हा मोड सर्वात चांगला.
ही ट्रिक फायदेशीर...
जर तुम्हाला विजेचं बिल कमी करायचं असेल तर तुम्ही खोलीत गेल्यावर १०-२५ मिनिटात टर्बो मोड ऑन करा. खोली थंड होताच तुम्ही एसी कुलिंग मोडवर सेट करा.