Smartphone Hidden Setting : स्मार्टफोन वापरत असताना काही सामान्य अॅप्स सुरु केल्या की, स्क्रीनवर वारंवार जाहिराती दिसतात. म्हणजे फोन वापरताना अचानक स्क्रीनवर जाहिराती पॉप-अप होतात किंवा नोटिफिकेशन येतात. कधी कधी तर पूर्ण स्क्रीनवरच प्रमोशनल मेसेज दिसतो.अशा जाहिरातींमुळे स्मार्टफोन वापरताना वेळही वाया जातो आणि महत्त्वाची कामे करण्यात अडथळाही निर्माण होतो. जर चुकून एखाद्या जाहिरातीवर क्लिक झाले तर तीच जाहिरात पुन्हा पुन्हा स्क्रीनवर येऊन इरिटेड करते.पण मोबाईल वापरकर्त्यांना आता काहीच टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला जाहिरातींच्या समस्येपासून मुक्त करण्याची जबरदस्त ट्रिक सांगितली आहे. वाचा सविस्तर माहिती..
या जाहिरातींपासून कशी होईल सुटका?
Android स्मार्टफोनमध्ये एक खास आणि लपलेली सेटिंग असते.ज्याच्या मदतीने बहुतेक जाहिराती ब्लॉक करता येतात.Private DNS असं या सेटिंग्जचं नाव आहे.ज्याला DNS-over-TLS असेही म्हणतात. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे ऑन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही वेगळ्या अॅपची गरज भासत नाही आणि फोनमधील अनेक अॅप्स व ब्राउझरमध्ये दिसणाऱ्या जाहिराती आपोआप बंद होतात.
नक्की वाचा >> BMC Exit Poll : मुंबईतील मराठ्यांनी कोणाला दिलं मत? महिला-पुरुषांची टक्केवारी किती? पाहा पक्षनिहाय आकडेवारी
Private DNS म्हणजे काय?
Private DNS म्हणजे इंटरनेट कनेक्शन अधिक सुरक्षित आणि स्वच्छ करण्याचा एक मार्ग आहे.जेव्हा तुम्ही एखादी वेबसाइट किंवा अॅप उघडता,तेव्हा DNS तुमच्या फोनला योग्य सर्व्हरशी जोडतो. Private DNS च्या मदतीने,जर तुम्ही dns.adguard.com सारखा अॅड-ब्लॉकिंग DNS वापरला,तर जाहिरातींशी संबंधित अनेक सर्व्हर आधीच ब्लॉक होतात.त्यामुळे जाहिराती तुमच्या स्क्रीनवर दिसणे बंद होतात.
नक्की वाचा >> भयंकर! ZP शिक्षक..उद्योजक अन् प्रसिद्ध किर्तनकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व एका क्षणात होरपळलं, 10 दिवसांपूर्वीच..
Android फोनमध्ये Private DNS कसं करावे ऑन?
सर्वात आधी फोनच्या Settings मध्ये जा. त्यानंतर Network & Internet किंवा Connection & Sharing सारख्या पर्याय निवडा.
साधारणपणे ही सेटिंग Automatic किंवा Off वर असते. ती बदलून तुम्हाला Private DNS Provider Hostname वर सेट करावी लागते. येथे dns.adguard.com किंवा dns.adguard-dns.com टाइप करून सेव्ह केल्यावर हे फीचर सक्रिय होते. सेटिंग ऑन होताच तुमच्या फोनच्या ब्राउझर आणि अनेक अॅप्समध्ये दिसणाऱ्या बहुतेक जाहिराती बंद होतात.