RTO चे हेलपाटे टाळा! ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC मध्ये मोबाईल नंबर घरबसल्या करा अपडेट

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया सरकारी वेबसाइट 'परिवहन सेवा'वर पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पूर्ण करता येते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • वाहन से संबंधित सभी अपडेट मोबाइल नंबर के जरिए भेजे जाते हैं।
  • RC में मोबाइल नंबर अपडेट करना बहुत ज्यादा जरूरी है।
  • ड्राइविंग लाइसेंस में मोबाइल नंबर आसानी से अपडेट कर सकते हैं।
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Update Mobile Number in Driving License and RC: वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) किंवा ड्रायव्हिंग लायसन्समध्ये (Driving License) तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर तो घरबसल्या अपडेट करू शकता. वाहनाशी संबंधित चालान, पीयूसीची मुदत, विमा नूतनीकरण आणि इतर सर्व आवश्यक माहिती आता एसएमएसद्वारे (SMS) मोबाईल नंबरवर पाठवली जाते.

आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया सरकारी वेबसाइट 'परिवहन सेवा'वर पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पूर्ण करता येते. तुमच्या लॅपटॉप किंवा फोनमध्ये ही प्रक्रिया सहज करू शकता.

(नक्की वाचा- Yavatmal News: शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेतील एका प्रश्नामुळे खळबळ; शिक्षकांनी व्यक्त केला संताप)

आरसी (RC) साठी प्रक्रिया

जर तुम्हाला तुमच्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रात (RC) मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील माहिती अचूकपणे भरावी लागेल.

  • वाहन रजिस्ट्रेशन नंबर
  • चेसिस नंबर
  • इंजिन नंबर
  • नोंदणीची तारीख
  • नोंदणी/फिटनेस वैधतेची तारीख
  • कॅप्चा कोड
  • सर्व माहिती भरल्यानंतर 'सबमिट'वर क्लिक कर

    ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रक्रिया

    जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या दुसऱ्या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.

    Advertisement

    • ड्रायव्हिंग लायसन्स नंबर
    • जन्म तारीख
    • डीएल धारकाचा शेवटचा ट्रान्झॅक्शन स्टेट
    • कॅप्चा कोड
    • सर्व माहिती भरल्यानंतर 'सबमिट'वर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

    क्यूआर कोडचा पर्याय

    स्क्रीनवर दिलेल्या क्यूआर कोड्सना स्कॅन करूनही ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रामध्ये तुमचा मोबाईल नंबर अगदी सोप्या पद्धतीने अपडेट करू शकता.