जाहिरात

Electric Car: पहिल्यांदाच हायब्रिड लूकमध्ये दिसणार सर्वांची आवडती 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये करणार 400 km पार

ही एसयूव्ही (SUV) मायक्रो इलेक्ट्रिक असणार आहे.याचसोबत कंपनी सर्वात लोकप्रिय कार क्रेटाला पहिल्यांदाच हायब्रिड इंजिनसह मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.

Electric Car:  पहिल्यांदाच हायब्रिड लूकमध्ये दिसणार सर्वांची आवडती 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये करणार 400 km पार
Hyundai Hybrid Version Creta Car

Hyundai Motors : पुढील 18 महिन्यांमध्ये भारतात बॅक टू बॅक अनेक गाड्या लॉन्च होणार आहेत. या नव्या लाइनअपमध्ये सर्वात मोठा धमाका टाटा पंच ईवी (Tata Punch EV) ला टक्कर देणारी एक स्वस्त कार करणार आहे. ही एसयूव्ही (SUV) मायक्रो इलेक्ट्रिक असणार आहे.याचसोबत कंपनी सर्वात लोकप्रिय कार क्रेटाला पहिल्यांदाच हायब्रिड इंजिनसह मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या लिस्टमध्ये एक जबरदस्त स्पोर्टी मिड-साइज SUV 'बेयॉन'ही सामील आहे.

ह्युंदाईची मायक्रो eSUV

ह्युंदाई एक नवीन मायक्रो इलेक्ट्रिक SUV वर काम करत आहे. या कारचं कोडनेम 'HE1i'ठेवण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ही बजेट-फ्रेंडली कार दोन वेगवेगळ्या LFP (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी पॅक ऑप्शनसोबत येऊ शकते.विशेष म्हणजे,ही छोटी कार सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत पोहोचू शकते. जी बजेट इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक गेम चेंजर ठरू शकते.

पहिल्यांदाच नव्या लुकमध्ये दिसणार क्रेटा हायब्रिड

ह्युंदाईची क्रेटा (Creta) नेहमीच मिड-साइज SUV सेगमेंटची किंग राहिली आहे. आता कंपनी या कारमध्ये जास्त मायलेज आणि एडवान्स टेक्नोलॉजीवर काम करत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच,2027 च्या सुरुवातीला क्रेटाला पहिल्यांदाच हायब्रिड पॉवरट्रेनसोबत लॉन्च केलं जाईल. या कारमध्ये 1.5 लीटर दमदार पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जो हायब्रिड सिस्टमला जोडणारा असेल. याचा थेट फायदा कारच्या मायलेजमध्ये मिळेल. यामुळे चालकांच्या खिशाला कात्री लागणार नाही आणि मारुतीच्या हायब्रिड कारला थेट टक्कर देईल.

या सप्टेंबरमध्ये येतेय स्पोर्टी SUV बेयॉन

जर तुम्ही स्पोर्टी आणि यूनिक लूकच्या गाडीचा शोध घेत असाल,तर ह्युंदाईचं हे सरप्राईज तुमच्यासाठी आहे. कंपनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन मिड-साइज SUV Bayon (बेयॉन) ला भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या कारचं डिझाईन खूप अॅग्रेसिव्ह आणि स्पोर्टी असेल. या कारमध्ये पहिल्यांदाच 1.2 लीटरचं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. ज्यामुळे शानदार पिकअप आणि ड्रायव्हिंग थ्रिल ऑफर मिळेल.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com