उन्हाळा सुरू होताच घराघरांमध्ये एसी लावला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात एसीमुळे आरामदायी वाटतं. मात्र एसी इतर थंडावा देणाऱ्या उपकरणांच्या तुलनेत महाग असतो आणि याचा अधिक वापर केल्यास खर्चही जास्त येऊ शकतो. त्यामुळे अनेकदा लोक इच्छा असून एसी खरेदी करीत नाही. कारण एसी खरेदी करण्याइतके पैसे असले तरी त्याच्या वापरानुसार दर महिन्याला वाढणारं बिल टेन्शन वाढवणारं असतं.
एसीचा किती वापर केल्यावर किती बिल येतं याच्या गणिताचा विचार तुम्ही कधी केला आहे का? सर्वसाधारणपणे घरात 1.5 टनचा एसी लावला जातो. त्यातही एसीमध्ये 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टारचे वर्जन सर्वाधिक विकले जातात. जर या ऋतुत तुम्हीही एसी खरेदी करण्याचं प्लान करीत असाल तर विजेचं बिल किती येतं याचं गणित मांडूया.
बाजारात 1.5 टनचा एसी सर्वाधिक विकला जातो. घरात लहान किंवा मोठ्या आकाराच्या खोल्यांमध्ये 1.5 टनच्या एसीमुळे चांगला गारवा निर्माण होतो. मात्र 1.5 टनचा एसी लावल्यानंतर विजेचं बिल किती येत? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगणार आहोत.
मार्केटमध्ये किती प्रकारचे एसी...
एसीचं विजेचं बिल हे पॉवर कंजम्पशनवर अवलंबून असतं. बाजारात एका स्टारपासून पाच स्टार रेटिंगचे एसी विकले जातात. एक स्टार एसी अत्यंत कमी किंमतीत मिळतो, मात्र या एसीमुळे जास्त वीज वापरली जाते. तर पाच स्टारचे एसी महाग असतात मात्र हा सर्वाधिक पॉवर एफिसिएंटदेखील असतो. त्याशिवाय 3 स्टारचा एसी चांगल्या कुलिंगसह तुमच्या खिशालाही परवडतो.
किती वीज वापरली जाते?
जर तुम्ही 5 स्टार रेटिंगचा 1.5 टनचा एसी लावू इच्छित असाल तर हा एसी साधारण 840 वॅट (0.8kWh) वीज प्रती तासानुसार वापरली जाते. जर तुम्ही रात्रभर आठ तास एसी वापरता तर त्यानुसार तुमचा एसी 6.4 युनिट वीज वापरली जाईल. तर तुमच्याकडे विजेचे दर 7.50 रुपये प्रति युनिट आहे, त्यानुसार एका दिवसात 48 रुपये आणि एका महिन्यात तब्बल 1500 रुपयांचं बिल येईल. त्याशिवाय 3 स्टार रेटिंगच्या 1.5 टनचा एसी 1104 वॅट (1.10kWh) वीज एका तासात वापरली जाईल. हा एसी तुम्ही आठ तास वापरला तर 9 युनिट वीज वापरली जाईल. यानुसार एका दिवसात 67.5 रुपये आणि एका महिन्यात दोन हजार रुपयांचं वीज बिल येईल. 5 स्टार रेटिंगच्या एसीवर महिन्यात 500 रुपयांची बचत होऊ शकते.