Job News: नोकरी ठरतेय जीवघेणी! दरवर्षी 8 लाखांहून अधिक मृत्यू; कारणंही तितकंच चिंताजनक

Job Risk: आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (ILO) ताज्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात 8.4 लाख लोकांचा मृत्यू कामाच्या ठिकाणच्या 'सायकोसोशल रिस्क'मुळे होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Psychosocial Risks at Workplace: ज्या नोकरीकडून सन्मानजनक जगण्याची अपेक्षा असते, तीच नोकरी आता अनेकांसाठी 'जीवघेणी' ठरत आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (ILO) एका नवीन जागतिक अहवालाने खळबळ उडवून दिली असून, कामाच्या ठिकाणच्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे.

काय आहे 'सायकोसोशल रिस्क'?

माणसाला कामाशी संबंधित चिंता, कामाचे वाढलेले तास आणि नोकरी कधीही जाऊ शकते ही भीती सतत सतावत असते. यालाच 'सायकोसोशल रिस्क' म्हणतात. यामुळे दोन प्रकारचे मोठे धोके निर्माण होतात. अति ताणामुळे हृदयविकार (Heart Attack) आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. तीव्र नैराश्य (Depression) आणि त्यातून आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

अहवालातील धक्कादायक  निष्कर्ष 

नोकरी जाण्याच्या भीतीतून दरवर्षी 8 लाखांहून अधिक लोक जीव गमावत आहेत. या आजारपणामुळे आणि वेळेपूर्वी होणाऱ्या मृत्यूमुळे जागतिक जीडीपीच्या 1.37 टक्के इतके प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या जोखमीमुळे दरवर्षी सुमारे 45 दशलक्ष 'डॅलीज' (आजारपणामुळे गमावलेली वर्षे) चे नुकसान होते.

तपासातून समोर आलेले पाच धोके 

ILO ने WHO आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (GBD) च्या मदतीने हे पाच मुख्य धोके ओळखले आहेत.

  • कामाचा अवाढव्य दबाव आणि तो पूर्ण करण्याची घाई.
  • कष्ट जास्त पण त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न किंवा कौतुक कमी.
  • कधीही कामावरून काढून टाकले जाण्याची भीती.
  • 8 तासांपेक्षा जास्त वेळ सतत कामात व्यस्त राहणे.
  • सहकारी आणि वरिष्ठांशी असलेले खराब संबंध किंवा अश्लील/अपमानास्पद वागणूक.

(नक्की वाचा- TCS Nashik Case: 'टीसीएस'मधील पासवर्ड देखील घाणेरडे! आणखी एका पीडितेने नोंदवला खळबळजनक जबाब)

अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑफिसचे नियम (पॉलिसी) कर्मचाऱ्यांच्या बाजूने असणे गरजेचे आहे. आजारपणात रजा मिळणे, घरच्या कामासाठी वेळ मिळणे आणि आरोग्याशी संबंधित सुविधा उपलब्ध असणे, हे आता केवळ 'सुख' नसून ती 'गरज' बनली आहे.
 

Topics mentioned in this article