Immortality by 2030 : मृत्यूवर विजय मिळवणं आता शक्य? 2030 पर्यंत माणूस होणार अमर! वाचा काय आहे नवं तंत्रज्ञान

Immortality by 2030? : मृत्यूवर विजय मिळवणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता कदाचित हो असं असू शकतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Immortality by 2030? : या तंत्रज्ञानामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया पूर्णपणे रोखता येईल. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Immortality by 2030? : मृत्यूवर विजय मिळवणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता कदाचित हो असं असू शकतं. आपण म्हातारे होणारच नाही आणि कायम तरुण राहून अमरत्व मिळवू शकू, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? हे वाचायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटत असलं, तरी एका जगविख्यात तज्ज्ञानं हा दावा केला आहे. आता केवळ 2030 पर्यंत प्रतीक्षा करा, कारण त्यानंतर तुमचं आयुष्य कायमचं बदलणार आहे.

अमरत्वाची नवी टेक्नॉलॉजी

हा कोणताही पोकळ दावा किंवा एखाद्या भोंदूबाबाचं भाकीत नाही. सुप्रसिद्ध अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि भविष्यवादी रेमंड कुर्झविल यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, 2030 पर्यंत जेनेटिक्स आणि रोबोटिक्सच्या मदतीनं असं एक तंत्रज्ञान विकसित होईल, जे माणसाला मृत्यूला चकवा देण्यास मदत करेल. या तंत्रज्ञानामुळे माणसाचं शरीर स्वतःच आजारांवर मात करेल आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कायमची थांबेल.

Advertisement

शरीरात फिरणारे सूक्ष्म रोबोट्स

रेमंड कुर्झविल यांच्या मते, नॅनो टेक्नॉलॉजी इतकी प्रगत होईल की शास्त्रज्ञ नॅनोबॉट्स नावाचे अतिसूक्ष्म रोबोट्स तयार करतील. हे रोबोट्स आपल्या रक्तातून शरीरात सोडले जातील. हे सूक्ष्म रोबोट्स 24 तास तुमच्या शरीराची निगराणी करतील. जर शरीरातील एखादी पेशी खराब झाली किंवा तुटली, तर हे रोबोट्स ती तात्काळ दुरुस्त करतील. इतकंच नाही, तर वृद्धत्वाकडे नेणाऱ्या पेशींना पुन्हा तरुण करण्याची क्षमता या नॅनोबॉट्समध्ये असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही आजारी पडण्याआधीच हे रोबोट्स तुम्हाला तंदुरुस्त करतील.

( नक्की वाचा : Parle G: शून्यातून विश्व कसं उभं करावं? 'पारले'च्या यशाचा हा थक्क करणारा इतिहास वाचायलाच हवा! )
 

काय आहे लाँगेव्हिटी  एस्केप व्हेलॉसिटी?

या संपूर्ण प्रक्रियेला कुर्झविल यांनी लाँगेव्हिटी एस्केप व्हेलॉसिटी असं नाव दिलं आहे. भौतिकशास्त्रात एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेग. तसंच लाँगेव्हिटी एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे वृद्धत्वाच्या विळख्यातून बाहेर पडणं. सध्या आपलं वय दरवर्षी एक वर्षानं वाढतं, पण या तंत्रज्ञानामुळे आपलं वय वाढण्याऐवजी दरवर्षी कमी होत जाईल. आपल्याला जगण्यासाठी दरवर्षी काही महिने बोनस मिळतील, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया पूर्णपणे रोखता येईल.

( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )
 

तुम्ही विश्वास का ठेवावा?

रेमंड कुर्झविल हे नाव तंत्रज्ञान विश्वात खूप मोठं आहे. त्यांनी याआधी केलेली अनेक भाकीतं तंतोतंत खरी ठरली आहेत. 1990 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की संगणक बुद्धबळात माणसाला हरवेल आणि 1997 मध्ये ते खरं ठरलं. इंटरनेट आणि सेल्फ ड्रायव्हिंग कारबाबतचे त्यांचे अंदाजही खरे ठरले आहेत. 2018 मध्ये त्यांनी म्हटलं होतं की, पुढील 10 ते 12 वर्षांत अमरत्व मिळवणं शक्य होईल. आता 2030 यायला केवळ काहीच वर्षं बाकी आहेत, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या दाव्याकडे लागलं आहे.

अमरत्वासोबत येणारी मोठी आव्हानं

खरोखरच माणूस अमर झाला, तर त्याचे परिणाम काय होतील, याचाही विचार करणं गरजेचं आहे. जर कुणीच मरणार नसेल, तर पृथ्वीवरची लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि संसाधनांची कमतरता निर्माण होईल. निवृत्तीचं वय, कौटुंबिक रचना आणि कामाच्या पद्धती पूर्णपणे बदलतील. यामध्ये आणखी एक धोका म्हणजे, हे महागडं तंत्रज्ञान सुरुवातीला फक्त श्रीमंतांनाच परवडेल, मग गरिबांचं काय? आपण मृत्यूला खरोखरच चकवा देऊ शकू की निसर्ग आपल्याला वेगळा धडा शिकवेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Advertisement
Topics mentioned in this article