जाहिरात

ITR Deadline 2026: जुलैमधील 3 महत्त्वाच्या तारखा, ITR फायलिंग आणि TDSची काम आटोपून घ्या अन्यथा बसेल मोठा फटका

ITR Deadline 2026: जुलै महिन्यातील टॅक्सपेअर्ससाठी महत्त्वाच्या डेडलाइन्स जाहीर झाल्या आहेत. कोणती कामं वेळेपूर्वी न केल्यास किती दंड भरावा लागेल, जाणून घ्या सविस्तर माहिती...

ITR Deadline 2026: जुलैमधील 3 महत्त्वाच्या तारखा, ITR फायलिंग आणि TDSची काम आटोपून घ्या अन्यथा बसेल मोठा फटका
"ITR Deadline 2026: जुलै 2026 मधील महत्त्वाच्या डेडलाइन"
Canva

ITR Deadline 2026: टॅक्सपेअर्ससाठी (करदात्यांसाठी) जुलै महिना हा वर्षातील सर्वात व्यस्त महिना असतो. वर्ष 2026 चा जुलै महिना देखील तुमच्यासाठी कर भरण्याच्या अनेक महत्त्वाच्या डेडलाइन्स घेऊन आला आहे. जर तुम्ही नोकरदार असाल, पेन्शनधारक असाल किंवा तुमचा कोणताही व्यवसाय नसेल, तर ITR करिता काउंटडाऊन सुरू झाला आहे. या महिन्यातील सर्वात महत्त्वाची तारीख 31 जुलै 2026 ही आहे, जी इनकम टॅक्स रीटर्न (ITR) फाइल करण्याचा शेवटची तारीख आहे. पण केवळ आयटीआरच नाही, तर जुलैमध्ये टीडीएस (TDS) पेमेंटपासून ते इतर अनेक महत्त्वाचे फॉर्म जमा करण्याची देखील अंतिम मुदत आहे. तुम्हाला या महिन्यात कोणती कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

7 जुलै 2026 : TDS

7 जुलै ही तारीख त्या लोकांसाठी महत्त्वाची आहे, जे टीडीएस भरतात. वास्तविक जून 2026 मध्ये कापलेला TDS सरकारी खात्यात जमा करण्याची अंतिम तारीख 7 जुलै आहे. याशिवाय ज्या असेसिंग ऑफिसर्सनी करदात्यांना त्रैमासिक (तिमाही) तत्त्वावर टीडीएस जमा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी एप्रिल-जून 2026 या तिमाहीचा टॅक्स जमा करण्याची शेवटची तारीख देखील हीच आहे. तसेच जून महिन्यात खरेदीदारांकडून मिळालेल्या फॉर्म 127 चे डिक्लेरेशन आणि जून तिमाहीत मिळालेल्या फॉर्म 121 चे डिक्लेरेशन अपलोड करण्याची अंतिम तारीख देखील 7 जुलै आहे.

(नक्की वाचा: Income Tax: पैशांची होणार मोठी बचत! या 7 कमाईवर लागत नाही एक रुपयाचाही टॅक्स; आयटीआर भरण्यापूर्वी नक्की वाचा)

30 जुलै 2026: Special Transaction

जर तुम्ही जून 2026 मध्ये एखाद्या विशेष व्यवहारावर (Special Transaction) टीडीएस कापला असेल, तर फॉर्म 141 मध्ये चालान-कम-स्टेटमेंट भरण्यासाठी 30 जुलै 2026 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. ही तारीख विसरण्याची चूक करू नका. 

31 जुलै 2026: ITR 

ही तारीख नोकरदार वर्ग, पेन्शनधारक किंवा व्यवसाय नसलेल्या करदात्यांसाठी आहे. या करदात्यांना फॉर्म ITR-1 किंवा ITR-2 द्वारे आपला टॅक्स रीटर्न 31 जुलै 2026 पर्यंत जमा करावा लागेल. येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, नॉन-ऑडिट बिझनेस आणि फ्रीलान्सर्ससाठी ही तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे.

डेडलाइन चुकली... तर काय होईल?

जर तुम्ही 31 जुलैपर्यंत तुमचा आयटीआर (ITR) फाइल केला नाही, तर तुम्हाला लेट फी (विलंब शुल्क) भरावी लागेल. उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 5 हजार रूपये आणि 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास 1 हजार रुपये लेट फी भरावी लागेल.

तसेच थकीत करावर सेक्शन 234A अंतर्गत दरमहा एक टक्का दराने व्याज द्यावे लागेल. याशिवाय उशीरा ITR फाइल केल्यास तुम्हाला जुन्या टॅक्स रिजीमचा (Old Tax Regime) पर्याय निवडता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला नवीन टॅक्स रिजीमच्या (New Tax Regime) हिशेबानेच टॅक्स भरावा लागेल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com