Induction Cooktop Hack : इंडक्शनवर सर्व भांडी वापरता येतील, ही आहे सोपी ट्रिक

LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लोक इंडक्शनकडे वळत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

How To Use Non Induction Pans On Induction Stove : LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे लोक इंडक्शनकडे वळत आहेत. अनेकांवर इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र इंडक्शन वापरण्यात अनेक मर्यादा येतात. इंडक्शनवर अन्न शिजविण्यासाठी वापरली जाणारी भांडी वेगळी असतात. तशी भांडी नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही.

अशात ग्राहकांना इंजक्शन विकत घेताना त्याची भांडीही विकत घ्यावी लागत आहे. दरम्यान तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे. इंडक्शनसाठीही नवी भांडी खरेदी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सर्व भांडी इंडक्शन फ्रेंडली करू शकता. यासाठी तुम्हाला फार खर्चही येणार नाही. तुमच्याकडील भांडी इंडक्शनवर वापरण्यासाठी तुम्हाला एक पातळ लोखंडाची जाळी खरेदी करावी लागेल.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, दुकानांबाहेर मोठी झुंबड; वस्तुंसाठी तब्बल 8 दिवसांचं वेटिंग

इंडक्शन कसं काम करतं?

इंडक्शन वीजेवर चालतं. इंडक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर काम करतं. याच्या काचेच्या टॉपच्या खाली एक तांब्याची कॉईल असते. जेव्हा तुम्ही इंडक्शन सुरू करता तेव्हा ही कॉइल एका मॅग्नेशियम फिल्डमध्ये बदलते. जेव्हा यावर लोखंडाचं किंवा स्टीलचं भांडं ठेवलं जातं, तर मॅग्नेटिक फिल्डमुळे भांड्याला करंट लागतो, ज्यामुळे भांडं गरम होतं. यामुळे इंडक्शन गरम होत नाही तर केवळ भांडं आणि त्यातील अन्न गरम होतं. दुसरं कोणतंही भांड यावर नीट बसत नसेल तर इंडक्शनवर लोखंडाची पातळ जाळी ठेवावी. इंडक्शनमुळे जाळी गरम होईल आणि त्यानंतर जाळीवर ठेवलेलं भांडं आणि भांड्यातील अन्नही गरम होईल.