वर्षातून दोन इंजेक्शनद्वारे मिळेल HIV मधून मुक्ती : रीसर्च

लेनकॅपाविर (Len LA) हे फ्यूजन कॅपसाइड इनहिबिटर आहे. हे एचआयव्ही कॅप्सिडमध्ये प्रवेश करते. कॅप्सिड एक प्रोटीन शेल जे एचआयव्हीच्या अनुवांशिक  आणि प्रतिकृतीसाठी आवश्यक एन्झाईम्सचे संरक्षण करते. दर सहा महिन्यांनी हे इंजेक्शन दिलं जातं.

Advertisement
Read Time: 2 mins

दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. न्यू प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस औषधाचे वर्षातून दोनदा इंजेक्शन घेतल्यास महिलांना एचआयव्ही संसर्गापासून संपूर्ण संरक्षण मिळू शकते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

क्लिनिकल ट्रायलमधून समोर आलेल्या माहितीनुसार, 'लेनकॅपावीर'चे सहा महिन्यांनी इंजेक्शन घेतले तर यामुळे इतर दोन औषधांच्या तुलनेत एचआयव्ही संसर्गाविरूद्ध  चांगली सुरक्षा मिळेत. तिन्ही औषधे प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस औषधे आहेत.

फिजिशियन-शास्त्रज्ञ लिंडा-गेल बेकर यांनी याबाबत म्हटलं की, लेनकॅपावीर आणि इतर दोन औषधांची चाचणी करण्यासाठी 5000 जणांना यात सहभागी करण्यात आलं होतं. युगांडामधील तीन आणि दक्षिण आफ्रिकेतील 25 साइट्सवर लेनकॅपावीर आणि इतर दोन औषधांच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्यात आली.

(नक्की वाचा- पाणीपुरी खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका? नवा स्टडी रिपोर्ट वाचून उडेल झोप)

लेनकॅपाविर (Len LA) हे फ्यूजन कॅपसाइड इनहिबिटर आहे. हे एचआयव्ही कॅप्सिडमध्ये प्रवेश करते. कॅप्सिड एक प्रोटीन शेल जे एचआयव्हीच्या अनुवांशिक आणि प्रतिकृतीसाठी आवश्यक एन्झाईम्सचे संरक्षण करते. दर सहा महिन्यांनी हे इंजेक्शन दिलं जातं.

Advertisement

पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत तरुणींमध्ये एचआयव्ही संसर्गाचं प्रमाण  सर्वाधिक आहे. अनेक सामाजिक आणि इतर कारणांमुळे त्यांना दैनंदिन प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस पथ्ये पाळणे आव्हानात्मक वाटते.चाचणीदरम्यान लॅन्कापॅविर इंजेक्शन घेतलेल्या 2134 महिलांपैकी एकही एचआयव्ही बाधित झाली नाही. त्यामुळे हे इंजेक्शन 100 टक्के कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले.

( नक्की वाचा : 'हे' 5 उपाय केल्यास तुमच्या जवळपासही फिरकणार नाही डेंग्यूचा डास )

क्लिनिकल ट्रायल महत्त्वाची का?

क्लिनिकल ट्रायलमुळे एचआयव्ही नियंत्रित करता येऊ शकतो अशी आशा निर्माण झाली आहे. ही एक अत्यंत प्रभावी प्रतिबंधक पद्धत आहे जी लोकांना एचआयव्हीपासून वाचवते. गेल्या वर्षी, जागतिक स्तरावर 13 लाख नवीन एचआयव्ही संसर्गाच्या केसेस आढळल्या होत्या. 2010 मध्ये ही संख्या 20 लाखांवर होती. UNAIDS ने 2025 साठी ही आकडेवीरी जागतिक स्तरावर 5 लाखांपेक्षा कमी आणि 2030 पर्यंत एड्सचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र या वेगाने हे लक्ष्य पूर्ण होऊ शकणार नाही, देखील स्पष्ट आहे.

Advertisement
Topics mentioned in this article