Interesting facts : बाटलीच्या झाकणाच्या रंगामागे लपलेलं असतं मोठं रहस्य, 99% लोकांना हे माहीत नाही!

यापुढे तुम्ही पाण्याची बाटली खरेदी करायला जाल, तेव्हा हे विविध रंग लक्षात ठेवा. 

जाहिरात
Read Time: 2 mins

bottle cap color meaning : घराबाहेर असताना तहान लागली की लगेच आपण पाण्याची बाटली खरेदी करतो. मात्र पाण्याच्या बाटलीची झाकणं वेगवेगळ्या रंगाची असतात, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय का? कधी निळा, सफेद, पिवळा, काळा...अशा विविध रंगाची झाकणं असतात. पण बाटलीची झाकणं अशा वेगवेगळ्या रंगाची का असतात?  (interesting facts)

निळ्या रंगाचं झाकण...

जेव्हा कधी तु्म्ही बाजारातून पाण्याची बाटली खरेदी करता तेव्हा अधिकांश बाटल्यांची झाकणं निळ्या रंगाची असतात. याचा अर्थ बाटलीतील पाणी एका झऱ्यातून घेतलं आहे. म्हणजेच ते मिनरल वॉटर आहे. जे आरोग्यासाठी चांगले आहे.

पांढऱ्या रंगाचं झाकण...

निळ्यानंतर सर्वाधिक पांढऱ्या रंगाची झाकणं असलेल्या बाटल्या बाजारात दिसून येतात. पांढऱ्या रंगाचा अर्थ हे पाणी मशीनमधून शुद्ध करून घेण्यात आलं आहे. म्हणजेच ते कोणत्याही आरओ प्लांट किंवा तत्सम फिल्टर मशीनमधून भरून तयार केले आहे. हे पाणी आरोग्यासाठी देखील चांगले आहे आणि तुम्ही ते वापरू शकता. 

हिरव्या रंगाचं झाकण...

तुम्ही अनेकदा हिरव्या रंगाचं झाकण असलेल्या बाटल्या पाहिल्या असतील. याचा अर्थ पाण्याच्या बाटतील फ्लेवर अॅड करण्यात आला आहे. पाण्याची चव बदलण्यासाठी असं केलं जातं. हे पाणीदेखील आरोग्याला नुकसान ठरत नाही. तुम्ही हे पाणी वापरू शकता. 

Advertisement

नक्की वाचा - Walking For Health : दररोज किती पावलं चालल्याने हार्टअटॅक येणार नाही?

काळ्या रंगाचं झाकण...

याशिवाय काळ्या रंगाच्या झाकणाची बाटलीदेखील मार्केटमध्ये दिसते. या बाटल्या इतर बाटल्यांपेक्षा महाग असतात. या पाण्याला 'अल्कलाइन वॉटर' म्हटलं जातं. हा पाणी खास पद्धतीने शुद्ध केलं जाचं. या पाण्यात अनेक मिनरल्स असतात. जगभरातील अनेक स्पोर्ट्सपर्सन आणि सेलिब्रिटी या पाण्याचा वापर करतात. 

पिवळ्या रंगाचं झाकण...

पाण्याच्या काही बाटल्यांच्या झाकणाचा रंग पिवळा असतो. बऱ्याच जणांना या रंगाचं झाकण असलेलं पाणी आवडतं. या पाण्यात विटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. 

Advertisement

यापुढे तुम्ही पाण्याची बाटली खरेदी करायला जाल, तेव्हा हे विविध रंग लक्षात ठेवा.