Women's Day 2026: महिला दिन का साजरा केला जातो? पहिला Women's Day कधी साजरा केला गेला? वाचा रंजक इतिहास

International Women's Day 2026 History: 8 मार्चचा इतिहास केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित नाही. न्यूयॉर्कमधील कामगार महिलांचा संघर्ष, क्लारा जेटकिन यांचा प्रस्ताव आणि रशियातील ऐतिहासिक आंदोलनातून उभा राहिलेला हा प्रेरणादायी प्रवास सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 4 mins
"International Women's Day 2026 History: महिला दिनाचा इतिहास"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील हजारो महिलांचं कामाच्या वेळा कमी, वेतन वाढ, मतदानाचा अधिकारासाठी आंदोलन
  • 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला
  • 1917 मध्ये रशियातील महिलांच्या आंदोलनाने राजकीय बदल घडवून आणले आणि 8 मार्च हा दिवस प्रसिद्ध झाला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

International Women's Day 2026 History: 8 मार्च ही केवळ एक तारीख नसून, ती लाखो महिलांच्या त्या संघर्षाचे आणि संकल्पाचे प्रतीक आहे, जो त्यांनी आपल्या सन्मानासाठी, समानतेसाठी आणि हक्कांसाठी दिला. आज जरी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य समारंभांचे आयोजन केले जात असले, पुरस्कार दिले जात असले आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असला, तरी या विशेष दिवसाचा पाया भेटवस्तू किंवा फुलांनी रचला गेला नाहीय. तर मोठं धाडस आणि अधिकारांच्या लढाईतून रचला गेला होता, या सत्याची माहिती फार कमी लोकांना आहे.

जर आपण थोडे मागे वळून पाहिले तर, वर्ष 1900 च्या सुरुवातीच्या काळात महिलांची स्थिती अतिशय बिकट होती. त्यावेळेस मोठ्या संख्येने महिला कारखाने आणि फॅक्टरीमध्ये काम करत असत, पण त्यांच्या कामाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना कित्येक तास काम करावे लागत असे, पण मोबदल्यात वेतन खूप कमी मिळत होते. इतकेच नव्हे तर त्या काळात महिलांना मतदानाचा अधिकारही नव्हता. समाज आणि राजकारणात त्यांना फारसे महत्त्व दिले जात नसे.

न्यूयॉर्कमधील 'त्या' हजारो महिलांचे आंदोलन | The 1908 New York Women's Protest | International Women's Day 2026

अशा परिस्थितीत महिलांनी गप्प बसण्याऐवजी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. 1908 मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात हजारो महिला वस्त्रोद्योग कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी उघडपणे आपल्या मागण्या मांडल्या. कामाचे तास कमी करावे, चांगले वेतन मिळावे, कामाची जागा सुरक्षित असावी आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. महिलांच्या या जिद्दीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. महिला आपल्या हक्कांसाठी उभ्या राहू शकतात आणि बदल घडवून आणू शकतात, असा संदेश त्यांच्या संघर्षाने दिला. याच आंदोलनाने पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा पाया रचला.

क्लारा जेटकिन आणि महिला दिनाचा प्रस्ताव | Clara Zetkin and the Birth of Women's Day | International Women's Day 2026

यानंतर दोन वर्षांनी, म्हणजेच वर्ष 1910 मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेत जर्मनीच्या प्रसिद्ध समाजसेविका क्लारा जेटकिन यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. जगभरातील महिलांसाठी एक खास दिवस असावा, ज्या दिवशी त्या एकत्रितपणे आपल्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी मागणी करू शकतील, असे त्यांनी सुचवले. परिषदेत उपस्थित प्रतिनिधींनी क्लारा जेटकिन यांचा हा प्रस्ताव एकमताने मान्य केला. त्यानंतर वर्ष 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी या आयोजनात 10 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. जागोजागी रॅली काढल्या गेल्या, सभा झाल्या आणि महिलांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला गेला.

Advertisement
रशियातील महिलांचे आंदोलन | Russia's ‘Bread and Peace' Movement | International Women's Day 2026

काही वर्षांनंतर आणखी एक ऐतिहासिक घटना घडली. वर्ष 1917 मध्ये रशियातील महिलांनी पहिल्या महायुद्धादरम्यान  आपल्या मागण्यांसाठी (Bread and Peace) संप पुकारला. हे आंदोलन इतके प्रभावी ठरले होते की, त्याने रशियाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला. या घटनेनंतरच 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.

(नक्की वाचा: Happy Women's Day 2026 Wishes 35+: स्वयंसिद्धा तू, रणरागिणी तू... महिला दिन 2026 निमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश)

Advertisement
संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता आणि प्रगती | UN Recognition and Global Progress | International Women's Day 2026 

काळाप्रमाणे या दिवसाचे महत्त्व वाढत गेले. वर्ष 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रानेही (United Nations) अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा दिवस जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्ध झाला. दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमसह साजरा केला जाऊ लागला, जसे की लैंगिक समानता, महिलांचे नेतृत्व, महिलांवरील हिंसाचार संपुष्टात आणणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.

आजची स्थिती आणि समानतेची लढाई | Current Status and the Fight for Equality | International Women's Day 2026

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एक औपचारिक दिवस उरलेला नाही. जगातील अनेक देशांमध्ये या दिवशी महिलांच्या यशाचा गौरव केला जातो. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम होतात, जनजागृती मोहिम राबवल्या जातात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अनेक ठिकाणी प्रेरणादायी महिलांचा सन्मान केला जातो.

Advertisement

आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण किंवा अंतराळ, अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण असे असले तरी समानतेची लढाई अजून पूर्णपणे संपलेली नाही. आजही महिला सुरक्षा, शिक्षण आणि समानता यासारख्या गंभीर मुद्यांमध्ये मोठ्या बदलांची गरज आहे.

(Content Source IANS)