iPhone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या आयफोनची किंमत किती, Sale कधीपासून होणार सुरू?

iPhone Pre-Booking : ची प्री-बुकिंग करण्याची तारीखही आता समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

Appleने सोमवारी रात्री iPhone 16 आणि iPhone 16 Pro  सीरीज लॉन्च केली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने Apple Watch Series 10, Apple Watch ultra 2, Apple AirPods 4 देखील लॉन्च केले आहेत. नवी सीरीज लॉन्च झाल्यामुळे अखेर आयफोन चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. काय आहे नव्या आयफोनची किंमत, तुमच्या खिशाला परवडणारी असेल का? जाणून घेऊया सविस्तर...

iPhone 16 आणि iPhone 16 Pro सीरीज अगदी नव्या शैलीत लॉन्च करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी डिजाइन, नवं अॅक्शन बटण , सुधारित कॅमेरा आणि आकर्षक कलर व्हेरियंटदेखील उपलब्ध करण्यात आलं आहेत. या फोनची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होत. 

iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची किंमत...
iPhone 16 आणि iPhone 16 Plus पाच वेगवेगळ्या कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. जे  Ultramarine, Teal, Pink, White  आणि काळ्या रंगात आहेत. यात 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. iPhone 16 ची किंमत 79,900 पासून सुरू हेते आणि iPhone 16 Plus साधारण 89,000 पासून मिळू शकतो. 
भारतात iPhone 16 Plus च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये असेल. 
भारतात iPhone 16 Plus च्या 256GB व्हेरिएंटची किंमत 99,900 रुपये असेल. 
भारतात iPhone 16 Plus च्या 512GB व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल.

नक्की वाचा - Job Interview Tips : मुलाखतीदरम्यान या चुका टाळल्यास तुमची नोकरी पक्की समजा! 

iPhone 16 Pro आणि 16 Pro Max ची किंमत...
iPhone 16 Pro (128GB)  ची किंमत 1,19,900 पासून सुरू होत आहे. तर iPhone 16 Pro Max (256GB) ची किंमत 1,44,900 पासून सुरू होते. 
भारतात iPhone 16 Pro च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 1,29,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 512 GB व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 1 TB व्हेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये असेल.

फीचर्सविषयी...
iPhone 16 मध्ये तुम्हाला 6.1-inch आणि iPhone 16 Plus मध्ये 6.7-inch चा डिस्प्ले मिळेल. स्क्रीन ब्राइटनेस 2000 Nits  ची आहे. यामध्ये तुम्हाला कॅमेरा कॅप्चर बटण दिसेल, ज्याचा वापर करीत तुम्ही एका क्लिकमध्ये कॅमेराचा एक्सेस मिळवू शकता. याशिवाय याचे वापरकर्ते फोटोही क्लिक करू शकतात. 

भारतात iPhone 16 Pro ची किंमत
भारतात iPhone 16 Pro च्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 1,29,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 512 GB व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये असेल.
भारतात iPhone 16 Pro च्या 1 TB व्हेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये असेल.

iPhone 16 सीरीजसाठी प्री ऑर्डर आणि सेल 
iPhone 16 सीरीजसाठी 13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू होतील. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून तुम्ही नवीन iPhones प्री-बुक करू शकाल. प्री-बुकिंगसाठी तुम्ही Apple India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही Apple Store, Unicorn Store, Amazon, Flipkart सारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सना देखील भेट देऊ शकता. याशिवाय कंपनी 20 सप्टेंबर 2024 पासून iPhone 16 सीरीजचा सेल सुरू करेल.