Bhutan best tour package : रोजच्या धावपळीत काही दिवसांचा ब्रेक घेण्याची तुमची इच्छा असेल तर आयआरसीटीसीचा (IRCTC) हा खास प्लॅन तुमच्यासाठीच आहे. आयआरसीटीसीकडून वेळोवेळी देशात तसंच परदेशातही फिरण्यासाठी काही प्लॅन जाहीर केले जातात. शाळा-कॉलेजमधील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीनं प्रवाशांसाठी भूतानचं खास पॅकेज जाहीर केलंय. 'भूतान द लँड ऑफ हॅप्पीनेस एक्स मुंबई' असं या पॅकेजचं नाव आहे.
भारताला लागून हिमालयाच्या कुशीत वसलेला भूतान हा देश पर्यटकांच्या आवडीचा आहे. नैसर्गिक सौंदर्य, पौराणिक कला, वेगवेगळे उत्सव आणि खाद्यपदार्थ याचा आनंद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक इथं येतात. आयआरसीटीसीच्या भूतान दौऱ्याची सुरुवात 27 मार्च रोजी होणार आहे. या दौऱ्यात तुम्हाला किती खर्च येईल? काय पाहता येईल? कसं बुकिंग करावं? ही सर्व माहिती आम्ही देणार आहोत.
काय आहे प्लॅन?
6 दिवसांच्या या प्लॅनची सुरुवात 27 मार्चला होईल. या दिवशी तुम्ही विमानानं मुंबईहून कोलाकातामर्गे भूतानमधील पारोमध्ये पोहोताल. त्यानंतर तुम्ही थिम्पूला रवाना व्हाल. थिम्पूमधील एका हॉटेलमध्ये तुमचा मुक्काम असेल. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही त्याच हॉटेलमध्ये असेल. 28 मार्चला सकाळी ब्रेकफास्टनंतर स्थानिक ठिकाणं तुम्हाला पाहता येतील. थिम्पूमधील प्रमुख आकर्षण केंद्र देखील यामध्ये पाहाता येतील. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही तुमच्या खर्चानं आणि जबाबदारीनं थिम्पू पाहाता येईल. त्यानंर रात्रीच्या जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था थिम्पूमधील हॉटेलमध्येच करण्यात आली आहे.
29 मार्च रोजी ब्रेकफास्टनंतर तुम्ही हॉटेलमधून चेक आऊट कराल. त्यानंतर तुम्ही पुनाखाला रवाना व्हाल. यावेळी वाटेल हिमालय पर्वताच्या सौंदर्याचा तुम्हाला अनुभव घेता येईल. तुम्हाला दोचुला व्ह्यू पॉईंट दाखवला जाईल. चिमिलखांग मंदिर, पुनाखा दजोंग आणि सस्पेंशन ब्रिज तुम्हाला पाहाता येईल. रात्री पुनाखामधील हॉटेलमध्ये तुमचा मुक्काम असेल.
30 मार्च रोजी पुनाखामधील हॉटलमधून ब्रेकफास्टनंतर चेक आऊट होईल. त्यानंतर तुम्ही पारोसाठी रवाना व्हाल. पारोमध्ये तुमच्या लंचची व्यवस्था असेल. लंचनंतर नॅशनल म्युझियम पाहाता येईल. त्यानंतर डिनर आणि रात्रीचा मुक्काम ही व्यवस्था पारोमधील हॉटेलमध्ये असेल.
किती आहे किंमत?
IRCTC भूतानच्या पॅकेजनुसार एका व्यक्तीच्या बुकिंगसाठी 96,800 रुपये तुम्हाला भरवे लागतील. दोन व्यक्तींचे बुकिंग करायचे असेल तर प्रती व्यक्ती 79,800 रुपये तर तीन व्यक्तींच्या बुकिंगसाठी प्रती व्यक्ती 78, 200 रुपये लागतील. तुमच्याबरोबर कोणते लहान मुल ( 5 ते 11 वर्ष) प्रवास करणार असेल तर त्यांच्या बेडसह बुकिंगसाठी प्रत्येक मुलासाठी 75, 200 रुपये खर्च करावा लागेल. बिना बेड बुकिंगसाठी प्रत्येक मुलामागे 70,700 रुपये खर्च येईल.