IRCTC Website Down: ऐन दिवाळीत IRCTC वेबसाइट ठप्प; प्रवाशांचा सुट्टीचं प्लॅनिंग फसल्याने संताप

IRCTC Server Down: तिकीट बुकिंग सुरू होताच, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास, तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे Downdetector या वेबसाइटच्या अहवालात दिसून येत  आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IRCTC Server Down for Tatkal tickets bega
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • IRCTC website down during Tatkal ticket booking on Friday morning causing disruption
  • Downdetector reported a sharp rise in complaints about IRCTC service outages around 10 am
  • Social media users criticised IRCTC for poor server capacity during festival peak hours
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

IRCTC Website Down : रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांचा बसला आहे. दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने प्रवासाची तयारी करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण शुक्रवारी सकाळी IRCTC ची वेबसाइट तांत्रिक बिघाड झाल्याने ठप्प झाली. तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होताच वेबसाइटने काम करणे बंद केले, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट बुकिंग सुरू होताच, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास, तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे Downdetector या वेबसाइटच्या अहवालात दिसून येत आहे. बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे वेबसाइटवर ताण आला आणि सिस्टिम क्रॅश झाली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Photo Credit: Downdetector/X

वेबसाइटवर The server is currently unavailable due to an influx of service requests अशा आशयाची सूचना दिसत होती. धनत्रयोदशीच्या अगदी आधी आणि तत्काळ बुकिंगच्या वेळीच ही समस्या आल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.

(नक्की वाचा-  Helicopter For Wedding: लग्नात हेलिकॉप्टरने करा रॉयल एन्ट्री! कसं करायचं बुकिंग, किती आहे भाडे? वाचा डिटेल्स)

वारंवार होणारा तांत्रिक बिघाड

IRCTC ची वेबसाइट क्रॅश होण्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये देखील अशाच प्रकारे तीन वेळा तांत्रिक बिघाड झाले होते. ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला होता. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी IRCTC हे एकमेव ऑनलाइन माध्यम असल्यामुळे, सणासुदीच्या काळात जेव्हा मागणी मोठी असते, तेव्हा अशाप्रकारे सिस्टम वारंवार बंद पडणे ही गंभीर बाब ठरते.

Advertisement

(नक्की वाचा- Good News! ट्रेनच्या AC कोचमध्ये मिळणार खास सुविधा, मळक्या ब्लँकेट्सची कटकट मिटली)

प्रवाशांचा सोशल मीडियावर संताप

संतप्त झालेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने पोस्ट केले की, "पुन्हा एकदा, तत्काळ बुकिंगच्या वेळीच IRCTC ची वेबसाइट आणि ॲप बंद झाले! सणांपूर्वी दरवेळी हेच घडते. कृपया तुमच्या सर्व्हरची क्षमता सुधारा."  अनेक प्रवाशांनी तिकीट बुक न झाल्यामुळे आपल्या गावी जाण्याचा प्लॅन रद्द करावा लागल्याची खंतही व्यक्त केली आहे.

Topics mentioned in this article