जाहिरात

Helicopter For Wedding: लग्नात हेलिकॉप्टरने करा रॉयल एन्ट्री! कसं करायचं बुकिंग, किती आहे भाडे? वाचा डिटेल्स

Helicopter Booking For Wedding: विशेषत: नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरमधून उतरणे किंवा नवरीला हेलिकॉप्टरमधून घेऊन जाणे हा नवा 'फॅशन ट्रेंड' बनला आहे.

Helicopter For Wedding: लग्नात हेलिकॉप्टरने करा रॉयल एन्ट्री! कसं करायचं बुकिंग, किती आहे भाडे? वाचा डिटेल्स

How To Book Helicopter For Wedding: दिवाळीनंतर लग्नसराईचा सिझन सुरु होईल. लग्न म्हटलं की थाटमाट अन् झगमगाट आलाच. अलिकडच्या काळात लग्नांमध्ये भव्यदिव्य, हटके स्टाईलमध्ये एन्ट्री करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. विशेषत: नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरमधून उतरणे किंवा नवरीला हेलिकॉप्टरमधून घेऊन जाणे हा नवा 'फॅशन ट्रेंड' बनला आहे. ग्रामीण भागातही होऊ दे खर्च म्हणत लग्नांमध्ये थेट हेलिकॉप्टरने एन्ट्री करायची अशी स्टाईल होत चालली आहे. पण यासाठी खर्चही तितकाच होतो. तुम्हालाही लग्नात हेलिकॉप्टरने एन्ट्री करायची आहे का? नेमका किती येईल खर्च? जाणून घ्या..

लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टर कसे कराल बुकिंग?| How To Book Helicopter For Wedding

 दिवाळीनंतर देशभरात अनेक विवाहसोहळे सुरू होणार आहेत आणि अनेक कुटुंबे आपला विवाहसोहळा खास (Memorable) बनवण्यासाठी हेलिकॉप्टरची बुकिंग (Booking) करत आहेत. प्रामुख्याने देशभरात  पवन हंस, अरिहंत, ब्लूहाइट्स एव्हिएशन, बद्री हेलिकॉप्टर्स आणि एक्रेशन एव्हिएशन (Pawan Hans, Cityflo, Arihant) यांसारख्या अनेक कंपन्या लग्नसमारंभासाठी हेलिकॉप्टर भाड्याने देतात. 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे  हेलिकॉप्टर उडवण्यासाठी, लँडिंग करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. हेलिकॉप्टरचे भाडे हे विविध निकषांवरुन ठरवले जाते. ज्यामध्ये  हेलिकॉप्टरचे मॉडेल, आकार (Size) आणि आसन क्षमता (Seating Capacity), उड्डाणाची वेळ आणि प्रवासाचे अंतर याचा विचार केला जातो.  हेलिकॉप्टरचे प्राथमिक भाडे प्रति तास सुमारे ५०,००० रुपयांपासून सुरू होतो. जर वरात लांबच्या अंतरावर गेली किंवा जास्त वेळ लागला.  तर हा खर्च २ लाख ते १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकतो.

Good News! ट्रेनच्या AC कोचमध्ये मिळणार खास सुविधा, मळक्या ब्लँकेट्सची कटकट मिटली

हेलिकॉप्टरचे भाडे किती? किती येतो खर्च? Helicopter Rent

यामध्ये  लहान म्हणजेच ६ ते ८ आसनी हेलिकॉप्टर ५०,००० ते ६०,००० रुपयांदरम्यान मिळू शकते. तर मोठे म्हणजेच  २० ते ३० आसनी हेलिकॉप्टरचा खर्च १.५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या कंपन्या विशेषतः लग्न समारंभासाठी वधू-वरांची एंट्री, पाठवणी किंवा खास पाहुण्यांच्या आगमनासाठी विविध पॅकेजेस (Packages) देतात, जे हेलिकॉप्टरचा प्रकार आणि उड्डाणाच्या कालावधीनुसार बदलतात.

 हेलिकॉप्टरचे भाडे हा एकमेव खर्च नसतो. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्थळी खास सोय करावी लागते. ज्यामध्ये  लँडिंग साईट (Landing Site) तयार करणे, समारंभाच्या ठिकाणी 'H' (Helipad) मार्किंग करणे. सुरक्षित लँडिंगसाठी जमिनीची पातळी नीट करणे. त्यासोबतच सुरक्षिततेची व्यवस्थाही ठेवावी लागते. एकंदरीत, लग्नसोहळ्यात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 'शाही एन्ट्री' करण्याची इच्छा असल्यास, त्यामागचे नियोजन आणि खर्च मोठा असतो.

Mumbai News: प्रसिद्ध अभिनेत्री 7 तास डिजिटल अरेस्ट; 6.50 लाख रुपयेही गमावले, नेमकं काय घडलं?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com