Holi 2026 Date In Maharashtra: भारतातील सर्वात मोठा अन् उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी अन् धुलवड. रंगांचा सण असलेल्या होळीची आणि धुलिवंदनाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो. लोक एकमेकांना रंग लावत, मिठाई वाटत उत्साहाने या जल्लोषात सहभागी होतात. मात्र, २०२६ मध्ये होळीवर एका दुर्मिळ खगोलीय घटनेचे म्हणजे 'खग्रास चंद्रग्रहणाचे' सावट असणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशीच हे चंद्रग्रहण येत असल्याने यंदा होळी नेमकी कधी साजरी करायची, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
चंद्रग्रहण आणि सूतक काळामुळे देशातील विविध राज्यांमध्ये होळीच्या तारखांमध्ये बदल झाला असून, महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये २ मार्च तर काही ठिकाणी ३ मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे. पंचांगकर्त्यांच्या मते, ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:२० वाजल्यापासून सायंकाळी ६:४७ वाजेपर्यंत चंद्रग्रहण असणार आहे. या ग्रहणामुळे सकाळी ६:२० पासूनच 'सूतक काळ' सुरू होईल. धार्मिक शास्त्रांनुसार, सूतक काळात आणि ग्रहणाच्या काळात कोणतेही मंगल कार्य किंवा पूजा-अर्चा केली जात नाही. त्यामुळेच होलिका दहनाच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Vasai Virar Politics: वसई-विरारमध्ये भाजपला खिंडार! ॲड. साधना धुरी यांचा 'बविआ'त प्रवेश
कोणत्या राज्यात कधी साजरी होणार होळी?
राजस्थान (कोटा, जयपूर)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
राजस्थान (जैसलमेर)
होलिका दहन : २ मार्च
होळी : ३ मार्च
महाराष्ट्र (मुंबई, पिंपरी, पुणे)
होलिका दहन : २ मार्च
होळी : ३ मार्च
महाराष्ट्र (नागपूर)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
नवी दिल्ली
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
गुजरात (अहमदाबाद, राजकोट, सुरत)
होलिका दहन : २ मार्च
होळी : ३ मार्च
कर्नाटक (बेंगळुरू, म्हैसूर)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
कर्नाटक (मंगळूर)
होलिका दहन : २ मार्च
होळी : मार्च 3
तेलंगणा (हैदराबाद, वरंगल)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
तामिळनाडू (चेन्नई, मदुराई, कोईम्बतूर)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
आंध्र प्रदेश (गुंटूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
पश्चिम बंगाल (कोलकाता, दुर्गापूर, सिलीगुडी)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
ओडिशा (भुवनेश्वर, राउरकेला, कटक)
होलिका दहन : ३ मार्च
होळी : ४ मार्च
इमारतीत बॉम्ब आहे...! Interview रोखण्यासाठी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने केलं मोठं कांड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world