Jackfruit Pickle Recipe: बाजारासारखे चवदार फणसाचे लोणचे वर्षभर टिकवायचे आहे? रेसिपी आणि या 5 टिप्स जाणून घ्या

Jackfruit Pickle Recipe: फणसाचे लोणचे वर्षभर टिकवायचे असेल, तर फणस सुकवण्यापासून ते तेलाच्या वापरापर्यंतच्या 5 महत्त्वाच्या टिप्स आणि सोपी रेसिपी या लेखात सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Jackfruit Pickle Recipe: फणसाचे लोणचे कसे तयार करायचे?"

Jackfruit Pickle Recipe: लोणचे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. उन्हाळा सुरू झाला की भारतीय घरांमध्ये लोणचे तयार करण्याची लगबग सुरू होते. आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, मिरचीचे लोणचे तर प्रत्येक जण बनवतो, पण जेव्हा फणसाच्या लोणच्याचा विषय येतो, तेव्हा त्याची चव काही निराळीच असते. फणसाचे लोणचे खायला अतिशय चविष्ट लागते. पण अनेकांकडून तुम्ही ऐकले असेल की, घरी फणसाचे लोणचे तयार केले तर ते लवकर खराब होते. जर तुम्हालाही हे लोणचे दीर्घकाळ व्यवस्थित साठवून ठेवायचे असेल, तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

फणसाचे लोणचे बनवताना या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या

1. फणसाची निवड
लोणचे बनवण्यासाठी नेहमी कच्चा आणि कडक फणस निवडा. फणस कापताना आपल्या हातांना आणि चाकूवर थोडे मोहरीचे तेल लावून घ्या, ज्यामुळे त्याचा चिक हाताला लागणार नाही. फणसाचे तुकडे जास्त छोटे किंवा जास्त मोठे कापून नका.

Advertisement

2. सुकवणे
फणसामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लोणचे लवकर खराब होते. फणसाचे तुकडे हळद आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ उकळल्यानंतर, ते कमीत कमी चार ते पाच तास कडक उन्हात कापडावर पसरवून सुकवून घ्या. जेव्हा यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल, तेव्हाच लोणचे दीर्घकाळ टिकेल.

3. मोहरीचे तेल
लोणचे खराब होऊ नये यासाठी मोहरीचे तेल हे सर्वात उत्तम प्रिजर्वेटिव्ह आहे. पण लक्षात ठेवा तेल नेहमी व्यवस्थित गरम करून आणि नंतर ते पूर्णपणे थंड झाल्यावरच लोणच्यामध्ये टाकावे.

(नक्की वाचा : स्ट्रॉने नारळ पाणी पिता? हिरव्या नारळाच्या आत लपलाय मृत्यू? डॉ त्यागींचा 'हा' खुलासा ऐकून पायाखालची जमीन सरकेल)

4. मसाले
बडीशेप, मेथी, कलौंजी, मोहरी आणि जिरे यासारखे मसाले लोणच्यात बारीक करून टाकण्यापूर्वी कढईत हलके गरम करून घ्या. यामुळे मसाल्यांमधील ओलावा नाहीसा होतो आणि लोणच्याला खूप छान सुगंध येतो.

Advertisement

5. काचेची बरणी
लोणचे ठेवण्यासाठी नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या जारचा (बरणीचा) वापर करा. प्लास्टिकच्या डब्यात लोणचे लवकर खराब होऊ शकते. बरणी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने धुवून उन्हात चांगली सुकवून घ्या.

(नक्की वाचा : What Is Acidity: पोटात जळजळ होते? अ‍ॅसिडिटी म्हणजे काय? तुमच्या या 7 वाईट सवयी तातडीने बंद करा, अन्यथा...)

Advertisement

फणसाचे लोणचे कसे तयार करावे, वाचा रेसिपी 

साहित्य:

  1. फणसाचे काप 
  2. मीठ
  3. हळद
  4. मोहरी 
  5. लाल तिखट
  6. कलौंजी
  7. हिंग
  8. मोहरीचे तेल

कृती:
फणसाचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम कापलेला फणस मिठाच्या पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर पाणी काढून घ्या फणसाचे काप सुकण्यासाठी ठेवा. जेव्हा फणस थंड होऊन सुकेल, तेव्हा त्यात मीठ, मोहरीची डाळ, लाल तिखट, कलौंजी आणि हिंग घाला. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा. चार दिवस हे मिश्रण तसेच ठेवावे, दिवसातून एकदा हे मिश्रण नक्की ढवळा.

यानंतर ते काचेच्या बरणीत व्यवस्थित घट्ट बंद करून ठेवा. आता मोहरीचे तेल चांगले गरम करून घ्या. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते फणसाच्या कापाच्या बरणीत ओता. लोणचे तेलात पूर्णपणे बुडाले पाहिजे. हे लोणचे मुरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागेल, त्यानंतर तुमचे लोणचे खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल. लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण योग्य असावे, याची विशेष काळजी घ्या, यामुळे हे लोणचे देखील इतर लोणच्यांप्रमाणे वर्षभर उत्तम राहील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)