Jaggery Benefits: काही लोकांना जेवणानंतर गूळ खाण्याची सवय असते, असे करताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का ही सवय फक्त चवीपुरतीच मर्यादित नाही, तर शरीरासाठीही कमाल आहे. नुकतेच आचार्य बालकृष्ण यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर गुळाचे काय फायदे आहेत? जेवणानंतर गूळ खाल्ल्याने काय होते? याबाबत माहिती शेअर केली आहे. तुम्ही देखील जेवणानंतर गूळ खात असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा...
येथे पाहा पोस्ट...
जेवणानंतर गूळ खाण्याचे फायदे?
आचार्य बालकृष्ण यांचे मानणे आहे की पोटाच्या आजारांसाठी गूळ कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. म्हणजेच जर कोणतीही व्यक्ती पोटाच्या समस्येने त्रासलेली असेल तर तिच्यासाठी गुळाचे सेवन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. इतकेच नाही तर जे लोक जेवणानंतर नेहमी पोट भरल्यासारखे म्हणजेच पोट जड झाल्यासारखे वाटते, त्यांच्यासाठीही गूळ खूप उपयुक्त ठरू शकतो.
(नक्की वाचा: Soaked Anjeer: सलग 30 दिवस मी रिकाम्यापोटी अंजीर खाल्लं, तरुणीने सांगितलं छोट्या फळाने तिचे आयुष्य कसं बदललं?)
जर तुम्ही रोज जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ला तर पचनाशी संबंधित समस्या जसे की गॅस, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगच्या (पोट फुगणे) समस्येपासून आराम मिळू शकतो. आचार्य बालकृष्ण यांच्या मते, रोज जेवणानंतर थोडासा गूळ तुमचे पोट निरोगी ठेवू शकतो.
अशा परिस्थितीत ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी नियमितपणे गुळाचे सेवन करणे किंवा आपल्या जीवनशैलीत याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
(नक्की वाचा: Acidity Home Remedies: पोटातील जळजळ आणि ॲसिडिटीने त्रस्त आहात? न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी सांगितले 5 सोपे उपाय)
गुळाचे फायदे
- शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यास मदत मिळते.
- शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.
- लिव्हर (यकृत) स्वच्छ करण्यास मदत मिळेल.
- ॲनिमियाच्या रुग्णांसाठीही गूळ खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)