- जॅग्वार लँड रोव्हर कंपनी २०२६ मध्ये भारतात नवीन इलेक्ट्रिक ४-दरवाजांची GT कार लॉन्च करणार आहे
- ही कार जॅग्वारच्या JEA प्लॅटफॉर्मवर आधारित असून एकदा चार्ज केल्यानंतर ७०० किलोमीटर अंतर धावू शकते
- कारमध्ये साधारण ५८० हॉर्सपावरची ताकद असून स्पोर्टी परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी डिझाइन केली आहे
Jaguar electric 4-door GT: लक्झरी कार निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या जॅग्वार लँड रोव्हर (JLR) कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी आगामी 2026 या वर्षात भारतात आपली नवी 'इलेक्ट्रिक 4-door GT' ही कार लॉन्च करणार आहे. आतापर्यंत भारतात केवळ पेट्रोल आणि डिझेल इंजिनवर लक्ष केंद्रित करणारी ही कंपनी आता इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज झाली आहे. या कारची अनेक वैशिष्टे आहेत. ही कार पाहीली तर तुमची नजर त्यावरून हटणार नाही.
ही नवीन कार जॅग्वारच्या विशेष 'JEA' (Jaguar Electric Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. तांत्रिक माहितीनुसार, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 700 किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकते. यात साधारण 580 हॉर्सपावरची ताकद मिळेल. ज्यामुळे स्पोर्टी परफॉर्मन्स चाहत्यांना एक वेगळा अनुभव मिळेल. एकचा चार्ज केल्यानंतर ही कार साधारण पणे सातशे किलोमिटर पर्यंत धावू शकते. त्यामुळे ही EV लक्झरी कार खास ठरते.
या कारचे डिझाइन कंपनीच्या 'Type 00' संकल्पनेवर आधारित आहे. लांब फ्लॅट बोनेट, स्लोपिंग रूफलाईन आणि स्पोर्टी लुक ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत अंदाजे 2 कोटी ते 2.5 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. 2026 च्या उत्तरार्धात ही कार रस्त्यावर धावताना दिसू शकते. जॅग्वारची ही नवीन इलेक्ट्रिक GT प्रामुख्याने स्पोर्टी परफॉर्मन्स आणि लक्झरी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे.
याचा 'टाईप 00' संकल्पनेवर आधारित लूक कोणालाही भुरळ घालेल असा आहे. यात बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे 700 किमीची रेंज मिळणार असल्याने लांबच्या प्रवासासाठी ही कार अत्यंत सोयीची ठरेल. कंपनी 2026 च्या अखेरीस ही कार जागतिक बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर ती भारतात उपलब्ध होईल. अंदाजे 2 कोटींहून अधिक किंमत असलेल्या या कारची सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी चर्चा आहे. जॅग्वारच्या या पुनरागमनामुळे लक्झरी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.