Vitamin B12 : किचनमधील 'हा' मसाला व्हिटॅमीन B12 चा खजिनाच! चिकन आणि मटणापेक्षाही जास्त पॉवरफुल्ल

व्हिटॅमीन B12 आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं घटक आहे. याची कमतरता असल्यास शरीरावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vitamin B12 Rich Foods

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमीन B12 आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं घटक आहे. याची कमतरता असल्यास शरीरावर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशक्तपणा,मानसिक आरोग्य बिघडणे, स्नायू-तंत्रिका संबंधी समस्या आणि अ‍ॅनामिया सारख्या समस्या निर्माण होतात. नॉन-व्हेज म्हणजेच मांसाहारी पदार्थांमध्येही व्हिटॅमीन B-12 मोठ्या प्रमाणात असतं. पण तुम्ही शाकाहारी असाल तर, भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने B12 ची कमतरता दूर करता येऊ शकते. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

भारतीय स्वयंपाकघरात असलेले जिरे हे असे मसाले आहे, जे केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानले जाते. जिरेला वैज्ञानिकदृष्ट्या (Cuminum cyminum) असे नाव आहे. साधारणपणे जिरे तडका देण्यासाठी जास्त वापरले जाते, पण ते आहारात इतर अनेक प्रकारेही समाविष्ट करता येते.

यात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर; व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, बी-कॉम्प्लेक्स (जसे नियासिन) तसेच प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यांसारखे अनेक गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. जिर्‍यामध्ये व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही जिरे आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.

नक्की वाचा >> आरोग्यासाठी कोणते तीळ चांगले? काळे की पांढरे? हिवाळ्यात खाल्ल्यानं काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे

जिरे कसे सेवन करावे?

जिर्‍यामध्ये व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही जिरे आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.

1) जिरे पावडर 

जिरे पावडर तुम्ही घरी तयार करू शकता. यासाठी जिरे हलके भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि एका डब्यात साठवून ठेवा. हे तुम्ही सॅलड, डाळ आणि भाजीमध्ये मिसळून खाऊ शकता.

Advertisement

नक्की वाचा >> Best Chakna: दारु पिताना काय खावं? Whisky सोबत सर्वात चांगला चकणा कोणता? फक्त 1 टक्के लोकांनाच माहितीय

2) दही 

जर तुम्हाला जिर्‍याची चव फारशी आवडत नसेल, तर तुम्ही दिवसभरात दह्यात मिसळून खाऊ शकता किंवा रायता बनवून खाऊ शकता.

3) जिरे पाणी 

जिरे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गरम करून हलके कोमट पाणी रिकाम्या पोटी प्या.