जाहिरात

आरोग्यासाठी कोणते तीळ चांगले? काळे की पांढरे? हिवाळ्यात खाल्ल्यानं काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे

तीळाला आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.विशेषतः हिवाळ्यात आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्यासाठी कोणते तीळ चांगले? काळे की पांढरे? हिवाळ्यात खाल्ल्यानं काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे
Black Sesame Seeds vs White Sesame Seed

White And Blcak Sesame Difference :  तीळाला आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.विशेषतः हिवाळ्यात आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.हे शरीराला उष्णता देण्याबरोबरच अनेक फायदेही देतात.परंतु, बाजारात दोन प्रकारचे तिळ मिळतात,पांढरे तीळ आणि काळे तीळ.त्यामुळे बहुतेकांच्या मनात प्रश्न येतो की, यापैकी कोणते तीळ खाणे अधिक फायदेशीर ठरते किंवा काळे तीळ आणि पांढरे तीळ यामध्ये नेमका काय फरक आहे? जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.याबाबत न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह पांचाल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी हिवाळ्यात कोणते तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, याची माहिती दिली आहे.

काळे तीळ खावे की पांढरे तीळ?

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, पांढरे तीळ आणि काळे तीळ दोन्हीही फायदेशीर आहेत.फक्त यातील पोषक घटक थोडे वेगळे असतात.त्यामुळे कोणते तीळ निवडायचे हे तुमच्या आरोग्याच्या गरजांवर अवलंबून असते. 

काळे तीळ खावेत की पांढरे तीळ?

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की पांढरे तीळ आणि काळे तीळ दोन्हीही फायदेशीर आहेत.फक्त यातील पोषक घटक थोडे वेगळे असतात. त्यामुळे कोणते तीळ निवडायचे हे तुमच्या आरोग्याच्या गरजांवर अवलंबून असते. 

काळे तीळ खाण्याचे फायदे

जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचे असेल, तर काळे तीळ खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. याशिवाय हे केस गळणे कमी करतात आणि केसांची वाढ होण्यास मदत करतात.थकवा दूर करून ऊर्जा पातळी वाढवतात. कमी आयर्न असलेल्या महिलांसाठी, पीसीओएस आणि अॅनिमियासाठी विशेषतः काळे तीळ चांगले असतात. हिवाळ्यात काळे तीळ शरीराला उष्णता आणि ताकद देतात.

नक्की वाचा >> Best Chakna: दारु पिताना काय खावं? Whisky सोबत सर्वात चांगला चकणा कोणता? फक्त 1 टक्के लोकांनाच माहितीय

पांढरे तीळ (White Sesame Seeds)

पांढऱ्या तीळांची साल काढलेली असतो,त्यामुळे त्यांचा पोत मऊ आणि चव हलकी असते.हे पचायला थोडे सोपे असतात. तसेच यामध्ये कॅल्शियम,हेल्दी फॅट्स आणि हाडांसाठी उपयुक्त खनिजे आढळतात.

पांढरे तीळ खाण्याचे फायदे

कॅल्शियमची चांगली मात्रा असल्यामुळे पांढरे तीळ हाडे आणि दात मजबूत करतात.
त्वचेतील ओलावा टिकवतात आणि स्किन बॅरियर सुधारतात.
सांध्यांच्या वेदनांमध्ये लाभदायक ठरतात.
मुलांसाठी,वृद्धांसाठी आणि कमी कॅल्शियम असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहेत.

नक्की वाचा >> Winter Trekking Destination: नवीन वर्षात पिकनिकला जायचंय? स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत 'ही' 3 ठिकाणं!

मग कोणते तीळ निवडावे?

जसे न्यूट्रिशनिस्ट सांगतात,पांढरे तिळ आणि काळे तीळ दोन्हीही पोषणाने भरपूर असतात आणि दोघांचे आपापले फायदे आहेत.तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणतेही तीळ निवडू शकता. जर तुम्हाला आयर्न वाढवायचे असेल,थकवा दूर करायचा असेल आणि केसांची वाढ सुधारायची असेल,तर काळे तीळ खा. कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी,हाडे मजबूत करण्यासाठी,त्वचेच्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी पांढरे तीळ खाणे अधिक चांगले ठरू शकते.

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com