Job Interview: इंटरव्यू के दौरान न करें ये गलतियां
देशात बेरोजगार तरुणांचं प्रमाण खूप मोठं आहे. त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा देखील तितकीच जास्त आहे. नोकरी सरकारी असो की खासगी मुलाखत द्यावी लागते. त्यामुळे एखाद्या नोकरीसाठी मुलाखतीला जाताना त्याची तयारी करणे गरजेचं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलाखतीला जाताना सर्व कागदपत्रे तपासली पाहिजेत. तसेच कोणते कपडे घालावेत याकडे देखील बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण मुलाखत केवळ तुमच्या ज्ञानाची आणि कौशल्याची नसून तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची असते. त्यामुळे मुलाखतीला जाताना कशी तयारी केली पाहिजे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
(नक्की वाचा - Aadhaar Card या पद्धतीनं घरीच करा मोफत अपडेट, उशीर केलात तर होईल खर्च !)
नोकरीच्या मुलाखतीत या चुका टाळा
- मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरं जावे. मुलाखतीला जातात आपण ही नोकरी मिळवणारच याच आत्मविश्वासाने जा.
- तुम्ही ज्या कंपनीत नोकरीची मुलाखत देणार आहात त्याबद्दल जास्तीत जास्त अभ्यास करा. कारण अनेकदा मुलाखतीत तुम्हाला तुमच्या कंपनीबद्दल प्रश्न विचारले जातात.
- मुलाखतीला जाताना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी तिथे पोहचा. यामुळे तुम्हाला तिथल्या वातावरणात मिसळायला वेळ मिळेल.
- मुलाखतीच्या ठिकाणी मोबाईलवर बोलणे, मेसेज पाहणे किंवा टाईप करणे टाळावे. यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो.
- मुलाखतीत तुमच्या जुन्या कंपनीबद्दल किंवा तेथील कर्मचाऱ्यांबद्दल कधीही वाईट बोलू नये.
- मुलाखतीत तुमचा परिचय देताना अतिशयोक्ती टाळावी. कारण असे केल्याने तुम्ही अडकू शकता आणि संपूर्ण मुलाखत खराब होऊ शकते.
- मुलाखतीत खोटी किंवा चुकीची माहिती देणेही टाळावे. कारण नंतर सत्य समोर आल्यास तुम्हाला अडचण होऊ शकते किंवा नोकरी देखील गमवावी लागू शकते.
- तुम्ही तुमची मागील नोकरी लवकर सोडली असेल तर त्यासाठी एक योग्य कारण द्यावे. जर तुम्ही नोकरी सोडण्याचे योग्य कारण सांगू शकत नसाल तर ते तुमच्या निष्ठा आणि वचनबद्धतेची कमी असल्याचे दाखवते.
- मुलाखतीच्या कामाचे तास, सुट्ट्या किंवा इतर फायदे-सुविधा विचारणे योग्य नाही. मुलाखत संपल्यानंतर तुम्ही कंपनी धोरणाबद्दल विचारू शकता.