Devshayani Ekadashi 2026: देवशयनी एकादशी, गुरुपौर्णिमा... वाचा जुलै महिन्यातील व्रत-सणांचे महत्त्व आणि तारीख

Devshayani Ekadashi 2026: जुलै 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान, जगन्नाथ रथयात्रा, देवशयनी एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंतच्या सर्व सणांची संपूर्ण यादी आणि तारखा येथे पाहा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Devshayani Ekadashi 2026: जुलै महिन्यातील प्रमुख सण आणि उत्सवांची यादी"
Photo Credit: NDTV

July 2026 Festival List: हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा महिना केवळ ऋतू बदलाचा काळ नसून भक्ती, उपवास आणि साधनेचा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यापासूनच भगवान विष्णू योगनिद्रेत जात असल्याने 'चातुर्मासाची' सुरुवात होते. याशिवाय जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा, अध्यात्मिक साधना असणारी गुप्त नवरात्री आणि गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा यासारखे मोठे उत्सव याच आषाढ महिन्यात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

जुलै महिन्यातील प्रमुख सण आणि उत्सवांची यादी| July 2026 Festival List

3 जुलै: संकष्टी चतुर्थी
7 जुलै: संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान
8 जुलै: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान
10 जुलै: योगिनी एकादशी
11 जुलै: भागवत एकादशी
13 जुलै: सोमवती अमावस्या
14 जुलै: ज्येष्ठ दर्श अमावस्या

Advertisement

16 जुलैपासून सुरू होणार जगन्नाथ रथयात्रा 

आषाढ महिन्यात महाप्रभू जगन्नाथ यांची रथयात्रा काढली जाते. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला देशातील सर्वात प्राचीन आणि भव्य धार्मिक उत्सवांपैकी एक असलेली भगवान जगन्नाथांची रथयात्रा मुख्य मंदिरापासून गुंडीचा मंदिरापर्यंत काढली जाते. यावर्षी 16 जुलैपासून सुरू होऊन 24 जुलैपर्यंत या रथयात्रेचे आयोजन केले जाईल.

25 जुलैला देवशयनी एकादशी | Devshayani Ekadashi 2026 Date

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असते. असे मानले जाते की, या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. या काळात विवाह, मुंडन आणि गृहप्रवेश यासारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. याचसोबत 'चातुर्मासाची' सुरुवात होते. यावर्षी 25 जुलैला देवशयनी एकादशी आहे.

15 जुलैपासून सुरू होणार गुप्त नवरात्री | Gupt Navratri 2026

आषाढ महिन्यातच गुप्त नवरात्र येते. शक्तीची उपासना आणि गुप्त साधनेसाठी हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. या काळात गुप्त मंत्रांद्वारे आई दुर्गेची पूजा केली जाते. या साधनेमुळे शत्रूंचा नाश होतो आणि सिद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. या दरम्यान सात्विक भाव, मौन, उपवास आणि ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता तसेच आत्मविश्वास मजबूत केले जाऊ शकते. यावर्षी गुप्त नवरात्र 15 जुलैपासून सुरू होऊन 23 जुलैला समाप्त होईल.

29 जुलैला गुरुपौर्णिमा | Guru Purnima 2026| Guru Paurnima 2026

आषाढ महिन्यातच गुरुपौर्णिमा येते. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा सण अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना समर्पित असतो. यावर्षी 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)