जाहिरात

Jyeshtha Purnima 2026: ज्येष्ठ पौर्णिमेचा मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या! आर्थिक भरभराटीसाठी करा हे उपाय

Jyeshtha Purnima 2026 Tithi and Shubh Muhurat: यंदा 29 जून रोजी सोमवारच्या शुभ संयोगात ज्येष्ठ पौर्णिमा साजरी होत आहे. जाणून घ्या तिथी, चंद्रोदयाची वेळ आणि लक्ष्मीमातेच्या कृपेसाठी करायचे सोपे उपाय.

Jyeshtha Purnima 2026: ज्येष्ठ पौर्णिमेचा मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या! आर्थिक भरभराटीसाठी करा हे उपाय
"Jyeshtha Purnima 2026 Tithi and Shubh Muhurat: ज्येष्ठ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त"
file photo
  • ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून 2026 रोजी सोमवारी साजरी केली जाईल
  • सोमवारचा शुभ योग असल्याने माता लक्ष्मीला प्रसन्न करून आर्थिक समृद्धी मिळवण्याचा विशेष योग जुळून आला आहे
  • ज्येष्ठ पौर्णिमेला व्रत, स्नान आणि दान करण्याला महत्त्व असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते

Jyeshtha Purnima 2026: ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला 'ज्येष्ठ पौर्णिमा' (Jyeshtha Purnima 2026) साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार या वर्षी ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 29 जून 2026 म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल. 29 जून रोजी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा अत्यंत खास आहे, कारण या दिवशी सोमवारचा शुभ योग जुळून येत आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो. उदय तिथीच्या नियमानुसार या दिवशी व्रत, स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रत ठेवले जाते तसेच विशेष पूजा केली जाते.

ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त | Jyeshtha Purnima 2026 Tithi And Shubh Muhurat

पौर्णिमा तिथी प्रारंभ: 29 जून 2026 सकाळी 3.06  वाजता
पौर्णिमा तिथी समाप्ती: 30 जून 2026 सकाळी 5.26 वाजता
चंद्रोदयाची वेळ: 29 जून 2026 संध्याकाळी 7.16 वाजता

(नक्की वाचा : Happy Vat Purnima 2026 Wishes 25+: सात जन्माची अतुट साथ आपली! वटपौर्णिमेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश)

ज्येष्ठ पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय | | Jyeshtha Purnima 2026 Upay

  • मखाणा खीर नैवेद्य: संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीला मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा आणि पूजेदरम्यान कनकधारा स्तोत्राचे पठण करावे.
  • कवड्यांचा उपाय: माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर 11 कवड्या अर्पण कराव्या. दुसऱ्या दिवशी त्या एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवाव्या.
  • पिंपळाच्या झाडाची पूजा: धनप्राप्ती आणि व्यवसायात लाभासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्यात कच्चे दूध आणि बताशे मिसळून अर्पण करावे.
  • एकाक्षी नारळ: या दिवशी माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करावा. दुसऱ्या दिवशी तो तिजोरीत ठेवल्याने घरात बरकत (समृद्धी) येते, असे म्हणतात.
  • चंद्रदेवाला अर्घ्य: पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवतेला दूध आणि गंगाजलाने अर्घ्य अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते.

(नक्की वाचा : Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य आणि महत्त्व; वाचा ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णींनी दिलेली माहिती)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com