Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर

Hair Growth Tips : केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर रामबाण घरगुती उपाय जाणून घेऊया... 

जाहिरात
Read Time: 2 mins

Hair Growth Tips : प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये तुपाचा डबा नक्कीच असतो. तुपाचे सेवन केल्यास संपूर्ण शरीरास फायदे मिळतात. याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही तुपाचा (Ghee For Hair) वापर केला जाऊ शकतो. तुपामध्ये फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन आणि चांगले फॅट्स असतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मजबूत आणि घनदाट केस हवे असल्यास ब्युटी केअर रुटीनमध्ये तुपाचा समावेश करावा. केसांसाठीचा (Tips For Long Hair) हा केमिकल फ्री उपाय आपल्या आई आणि आजीने त्यांच्या तरुणपणामध्ये केला आहे. तुपाचा वापर केल्यास केसांची वाढ होण्यास कशा पद्धतीने मदत मिळू शकते? केसांना अन्य कोणकोणते फायदे मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केसांच्या वाढीसाठी तुपाचा वापर कसा करावा?| Ghee For Hair Growth 

  • केसांना योग्य पद्धतीने तूप लावल्यास स्कॅल्पला ओलावा मिळतो. 
  • कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 
  • कोंड्यामुळे स्कॅल्पला येणारी खाज कमी होते. 
  • तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि हेल्दी फॅटी अ‍ॅसिड अधिक असल्यामुळे केसांची वाढ जलदगतीने होते. 

(नक्की वाचा: Hair Care Tips : या 5 गोष्टींचे करा सेवन, गळणार नाही तुमचा एकही केस)

  • तुपामुळे केसगळतीची समस्याही कमी होते. 

  • तुपामुळे स्कॅल्प हायड्रेटेड राहते. 
  • तुपातील पोषणतत्त्वांमुळे केसांवर चमक येते आणि केस मऊ देखील होतात. केसांचे टेक्श्चरही सुधारते. 
  • केसांकरिता तूप नॅचरल कंडिशनरप्रमाणे काम करते. केसांचा कोरडेपणा कमी होतो. 

केसांवर तूप लावण्याची योग्य पद्धत

  • तूप हलकेसे गरम करा. यानंतर मुळासह संपूर्ण केसांना तूप लावावे. 
  • कापसाच्या मदतीने केसांना तूप लावावे. 
  • हेअरमास्कप्रमाणेही तुपाचा वापर करू शकता. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.  
  • केस धुतल्यानंतरही थोडेसे तूप सीरम किंवा कंडिशनरप्रमाणे केसांवर लावू शकता. यामुळे प्रदूषण आणि उन्हापासून केसांचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.  

(नक्की वाचा : Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ)

या गोष्टींचीही घ्या काळजी

  • तुपामुळे केसांना मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. पण योग्य प्रमाणात तुपाचा वापर न केल्यास केसांचे नुकसानही होऊ शकते. 
  • तूप जास्त वेळ स्कॅल्पवर लावून ठेवले तर त्यावरील छिंद्रांमध्ये घाण जमा होऊ शकते. 
  • कित्येकदा डोक्याच्या भागाकडे कीटकही आकर्षित होऊन फिरू लागतात.
  • शिवाय केस चिकटही होतात. त्यामुळे शक्यतो कमी प्रमाणामध्ये केसांवर तूप लावावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )