जाहिरात

सकाळी पोट साफ होत नाही, मग रोज रात्री झोपण्याच्या आधी करा 'हा' घरगुती उपाय

जर तुम्हीही पोट साफ होण्यासाठी उपाय शोधत असाल, तर येथे काही प्रभावी घरगुती उपाय दिले आहेत.

सकाळी पोट साफ होत नाही, मग रोज रात्री झोपण्याच्या आधी करा 'हा' घरगुती उपाय

Constipation Home Remedies: पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय आहेत.  आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पचनाची समस्या नेहमी येते. त्यामुळे अनेकाना त्याचा त्रास होतो. त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्याचा त्रास मात्र दिवसभर होतो. पोटात जडपणा, चिडचिडेपणा आणि थकवा जाणवतो. यामुळे पोटात दुखणे आणि सूज येण्याची समस्या देखील उद्भवते. जर तुम्हीही पोट साफ होण्यासाठी उपाय शोधत असाल, तर येथे काही प्रभावी घरगुती उपाय दिले आहेत. ते पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत करतात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' 5 गोष्टी

  • कोमट पाणी + लिंबू + मध: एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळून झोपण्यापूर्वी प्या. हे पचनक्रिया चांगली करते. त्यामुळे सकाळी शौचास कोणताही त्रास होत नाही.  
  • त्रिफळा चूर्ण: आयुर्वेदामध्ये त्रिफळा आतड्यांच्या स्वच्छतेसाठी अमृत मानले जाते. रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या.
  • इसबगोलचा चुरा: एक ग्लास दूध किंवा पाण्यात 1-2 चमचे इसबगोल मिसळून पिल्याने शौच नरम होते. आतड्यांची स्वच्छता होते.
  • ओवा आणि बडीशेपचे पाणी: प्रत्येकी एक चमचा ओवा आणि बडीशेप पाण्यात उकळून गाळून घ्या आणि झोपण्यापूर्वी प्या. हे गॅस आणि अपचन दूर करते.
  • गरम दूध + साजूक तूप: एक ग्लास गरम दुधात 1 चमचा साजूक तूप मिसळून पिल्याने आतड्यांना चिकटपणा येतो.  सकाळी शौचास सहजता येते.

पोट साफ ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा:

  • दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या.
  • पपई, ओट्स, पालक, सफरचंद याचा आहार घ्या 
  • दररोज 30 मिनिटे फिरा किंवा योगा करा.
  • ताण कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.

जर तुम्हीही सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर येथे सांगितलेले उपाय काही दिवस करून पहा. हे केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देणार नाहीत, तर पचनसंस्थेलाही मजबूत बनवतील. कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

पोट साफ करण्यासाठी चिया सीड्स (Chia Seeds) खूप प्रभावी
चिया सीड्स पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय मानले जाते. हे लहान बिया फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडने (Omega-3 Fatty Acids) भरपूर असतात. जे पचनसंस्थेला सक्रिय आणि संतुलित ठेवण्यास मदत करतात.

चिया सीड्स पोट कसे साफ करतात?

  • त्यामध्ये असलेले विद्रव्य फायबर (Soluble Fibre) पाणी शोषून घेते. यामुळे शौचास कोणतीही अडचण येत नाही. 
  • हे जेल आतड्यांच्या स्वच्छतेस मदत करते आणि शौचास सहजता आणते.
  • चिया सीड्स 12-15 पट पाणी शोषू शकतात. ज्यामुळे पोटात बल्क तयार होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

सेवन कसे करावे:

  • 1-2 चमचे चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  • सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यासोबत सेवन करा.
  • तुम्ही ते दही, किंवा ताकात मिसळून देखील घेऊ शकता.
  • या गोष्टी लक्षात ठेवा:
  • सुरुवातीला कमी प्रमाणात सुरुवात करा जेणेकरून शरीराला फायबरची सवय होईल.
  • पुरेसे पाणी प्या, अन्यथा बद्धकोष्ठता वाढू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com