जाहिरात

Homemade Limbu Pani Recipe: लिंबू पाणी बनवताना करताय ही चूक? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

Lemonade Making Mistakes: परफेक्ट लिंबू पाणी कसे तयार करायचे? जाणून घ्या 5 सोप्या टिप्स आणि योग्य पद्धत जाणून घ्या.

Homemade Limbu Pani Recipe: लिंबू पाणी बनवताना करताय ही चूक? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
"Limbu Pani Perfect Recipe : लिंबू पाणी तयार करण्याची परफेक्ट पद्धत"
Canva

How To Make Perfect Lemon Water: उन्हाळ्यात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणजे लिंबू पाणी. थकवा दूर करण्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठीही लिंबू पाणी या पेयाला पहिली पसंती दिली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रेस्टॉरंट किंवा एखाद्या छोट्या स्टॉलवरील लिंबू पाण्याची चव वेगळीच लागते? बहुतांश वेळेस लिंबू पाणी तयार करताना आपल्याकडून एक चूक होते, ज्यामुळे चव आणि लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे दोन्ही कमी होतात. चला जाणून घेऊया लिंबू पाणी तयार करण्याची परफेक्ट पद्धत... 

लिंबू पाणी तयार करताना होणारी सर्वात सामान्य चूक  (​Common Mistakes Making Lemonade)

बहुतांश वेळेस लोक एक ग्लास थंड पाण्यात साखर आणि लिंबाचा रस मिक्स करतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. थंड पाण्यात साखर खूप उशीराने विरघळते. जोपर्यंत साखर विरघळते तोपर्यंत पाण्याचे तापमान वाढते. तसेच आपण फक्त लिंबाच्या रसाचा वापर करतो, लिंबाच्या सालीमध्ये तेल आणि सुगंध असतो. 

​परफेक्ट लिंबू पाणी तयार करण्याची पद्धत (What Is The Right Way To Make Perfect Lemonade)

1. साखर मिक्स करा

सर्वप्रथम थोड्या कोमट पाण्यात साखर पूर्णपणे विरघळवून घ्या. थोडेसे घट्ट स्वरुपात पाणी तयार करून घ्या. थंड पाण्यात थेट साखर मिक्स करण्याची कधीही चूक करू नका.   

(नक्की वाचा: Red Ants Removal Tips: लाल मुंग्यांमुळे हैराण झाले आहात? केमिकल न वापरता फॉलो करा 3 उपाय, कायमचा होईल बंदोबस्त)

2. लिंबू कसा पिळावा?

लिंबू कापण्यापूर्वी तळहातावर पिठाच्या गोळ्यासारखा फिरवा. यानंतर कापा आणि त्यानंतर पाण्यात पिळावा. यामुळे लिंबाचा रस जास्त प्रमाणात निघतो.  

3. सालीचा वापर

लिंबू अर्धे कापण्यापूर्वी, त्याच्या वरचा पिवळा भाग थोडा किसून घ्या. लेमन जेस्ट पाण्यात मिक्स करा. यामुळे लिंबू पाण्याला सुंदर सुगंध येतो. लिंबाचा पांढरा भाग किसू नका,अन्यथा लिंबू पाण्याला कडू चव येईल.

(नक्की वाचा: Health Benefits Of Soaking Mangoes: आंबा 1 तास पाण्यात भिजत ठेवून खावा, असे आजी का सांगते? वाचा डॉ समीर भाटींनी सांगितलेले सत्य)

4. काळे मीठ आणि भाजलेले जिरे

लिंबू पाण्यात नेहमी थोडे काळे मीठ आणि तव्यावर भाजलेले जिरे पूड घालावी.

5. पुदिना 

पुदिन्याची चार ते पाच पाने पाण्यात मिक्स करा. यामुळे पेयाला नैसर्गिक 'कुलिंग इफेक्ट' मिळतो.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com